शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जेल अधीक्षक हल्लाप्रकरणी अजय गालटला शिक्षा

By admin | Updated: August 6, 2015 01:14 IST

पाच वर्षांंचा सश्रम कारावास व दंड.

अकोला: मध्यवर्ती कारागृहाच्या तत्कालीन अधीक्षिका स्वाती साठे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करणारा आरोपी अजय गालट याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी मंगळवारी कठोर शिक्षा सुनावली. गालटला विविध गुन्हय़ांमध्ये पाच वर्षांंचा सश्रम कारावास व ६0 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी दोन वर्ष, सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकोल्यातील यादव नावकार खून खटल्यातील शिक्षा झालेला आरोपी अजय रघुराम गालट हा कारागृहात असताना त्याने २२ डिसेंबर २000 रोजी सायंकाळी ६ वाजता मध्यवर्ती कारागृहाच्या तत्कालीन अधीक्षिका स्वाती साठे यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी साठे यांच्या सोबत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी गालटला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंंत त्याने साठे यांना मारहाण केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. यासोबतच काही पोलीस कर्मचारीही या मारहाणीत जखमी झाले होते. त्यानंतर या प्रकरणी स्वाती साठे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अजय गालटविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून सिटी कोतवाली पोलिसांनी २९ जुलै २00१ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २६ जुलै २00२ रोजी अजय गालटची निर्दोष मुक्तता केली होती.