शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आयसीयुमधील रुग्णांना जंतूसंसर्गाचा धोका!

By admin | Updated: October 8, 2016 03:08 IST

खिडक्या-दार सताड उघडे : अशुद्ध हवा, रोगजंतूंचा थेट प्रवेश.

अतुल जयस्वाल अकोला, दि. 0७-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागावरच उपचार करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही रुग्णालयातील अतिदक्षता विभाग हा बाहेरच्या अशुद्ध हवेला अटकाव करण्यासाठी काचबंद व वातानुकूलित असावा, असा दंडक आहे. सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मात्र या नियमाला अपवाद ठरत आहे. दार व खिडक्या सताड उघड्या असतात. परिणामी बाहेरची दूषित व रोगजंतूयुक्त हवा सरळ आतमध्ये शिरते. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची शक्यता आहे.सवरेपचार रुग्णालयात दाखल होणार्‍या गंभीर आजारांच्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. या रुग्णांना चोवीस तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवता यावे व वातावरणातील अशुद्ध हवा व रोगजंतूंच्या संपर्कात रुग्ण येऊ नये यासाठी ही व्यवस्था आहे. येथील अतिदक्षता विभाग २0 खाटांचे असून, ते नेहमीच रुग्णांनी गजबजलेले असते. अतिदक्षता विभागात इतर सुविधा असल्या तरी येथील वातानुकूलित यंत्रणा अपुरी पडत आहे. परिणामी उपलब्ध वातानुकूलित यंत्रांवर भार येऊन ते वारंवार निकामी होतात.विभागाला लागूनच घाणीचे साम्राज्यया विभागाला लागूनच मोकळी जागा आहे. या जागेवर रुग्णाचे नातेवाईक उरलेले अन्न व कचरा टाकतात. पावसामुळे सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. यामुळे बाहेरची दुर्गंधी विभागात पसरते. याचा त्रास विभागातील गंभीर रुग्णांना होत आहे.अतिदक्षता विभागाचा हॉल मोठा असून, वातानुकूलन यंत्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे ही यंत्र वारंवार नादुरुस्त होतात. सध्या अनेक वातानुकूलन यंत्रे निकाली झालेली आहेत. त्यामुळे खिडक्या उघड्या असतात. परंतु, रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जाते. - डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय