अकोला : मनुष्याला अनेक व्यसने असतात. परंतु वाईट व्यसने काही कामाची नाहीत. प्रभूनामाच्या भक्तीचे व्यसन प्रत्येकाला असले पाहिजे कारण यातच मनुष्याचे कल्याण आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीचे व्यसन धरा असे मत परभणी जिल्ह्यातील सेलू येथील ह.भ.प.वसंतबुवा मंडलि यांनी शुक्रवारी अकोल्यात व्यक्त केले. श्री ब्रह्मचैतन्य धार्मिक सेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित नाईकवाडे कीर्तन महाविद्यालयाच्या वतीने व प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या सहकार्याने आयोजित नारदीय कीर्तन महोत्सवाचे अंतीम पुष्प गुंफतांना वसंतबुवा मंडलिक बोलत होते. मंडलिक यांनी निरुपनासाठी ह्यअसा धरी छंद, जाई तुटोनिया भवबंधह्ण हा अभंग घेतला. पुढे निरुपन करताना त्यांनी प्रभूनामा सारखे सुरेख दुसरे कुठलेच व्यसन नसल्याचे सांगितले. विद्या ध्यासाचे, देशभक्तीचे आणि ज्ञानदानाचे व्यसन अंगिकारा असे आवाहन बुवांनी केले. भाऊसाहेब नाईकवाडे यांच्या हस्ते बुवांचा सत्कार करण्यात आला. संवादिनीवर श्रीकिसन जयस्वाल, तबल्यावर मनोज जहागिरदार यांनी तर टाळाची साथ धनश्री मुळावकर यांनी दिली. संचालन डॉ. कल्याणी पद्मने यांनी तर आभार डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी मानले.
चांगल्या गोष्टींचे व्यसन असावे
By admin | Updated: November 15, 2014 00:16 IST