शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जऊळका पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन

By admin | Updated: March 18, 2017 15:23 IST

मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनला आयएसओ ३००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.

जऊळका रेल्वे: मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनला आयएसओ ३००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. याबद्दल ठाणेदार आर. जी. शेख यांचा शुक्रवारी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशनला आयएसओचा दर्जा प्राप्त करून देण्याचा निर्धार पोलिस अधिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.जाझ-एन्झ या आंतरराष्ट्रीय कंपनीने प्रतिनिधी प्रमोद पाटील व त्यांच्या चमूने जऊळका पोलिस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली, तसेच जऊळका पोलिस स्टेशनचे सौंदर्यीकरण व जागोजागी लावलेले वृक्ष मनमोहीत करणारे असल्याचे त्यांना दिसले. त्याशिवाय विद्युत प्रकाशासाठी जागोजागी लावलेले दिवे आणि पोलिस स्टेशनच्या कार्यपद्धतीत झालेला बदल, गुन्ह्यात झालेली घट पाहता या पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन देण्यात आले.  पोलिस स्टेशन अंतर्गत ४२ गावे येत असून, ठाणेदार शेख रुजू झाल्यापासून या परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहून गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पोलिस अधिक्षक होळकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक स्वप्ना गोरे उपस्थित होते. पोलिस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचीही यात मोलाची भूमिका असल्याचे मत पोलिस अधिक्षकांनी व्यक्त केले.