शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वनराई बंधाऱ्यातून होणार १०० एकरावर सिंचन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:32 IST

परिसरातील ३५ शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : दरवर्षी दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भंडारज बु.च्या ग्राम एकता जलसंवर्धन समितीने मोहाडी नाल्यावर वनराई बंधारा उभारला. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत पाऊस झाल्याने हा वनराई बंधारा तुडुंब भरला आहे. त्यामुळे यावर्षी वनराई बंधाºयाच्या पाण्यावर परिसरातील १०० एकरावर सिंचन होणार आहे. परिसरातील ३५ शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.भंडारज बु. परिसरात दरवर्षी अल्प पाऊस असल्यामुळे दुष्काळी स्थिती असते. तसेच पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. जलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सिंचन करणे जिकिरीचे झाले होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्राम एकता जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष माजी सरपंच दीपक इंगळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाºयामुळे परिसरातील ३५ विहिरींची पाण्याची पातळी वाढली असून, ती उन्हाळ्यातही कायम राहणार आहे. मोहाडी नाल्यावर दोन मीटर रुंदीच्या बंधाºयाचे पाणी दीड किमी लांब पसरले आहे. या बंधाºयात अठरा कोटी लीटर जलसाठा जमा झाला असून, ओव्हर फ्लो कायम आहे. या बंधाºयास पाच मीटर लांब प्लास्टिक कापड लागला आहे. तीन हजार रुपये खर्च आला आहे. शेतातील हिरवा झाडपाला, तरोटे, गवत याचा अंतर्भाव आहे. पर्यावरणपूरक हा बंधारा अतिशय कमी खर्चात अधिक लाभदायक असून, कमी वेळात तयार होते. याचे शास्त्रीय नाव शिवज्योती बंधारा आहे. शास्त्रोक्त मार्गदर्शन कृषी सहायक भाष्कर इंगळे यांनी दिले आहे. बंधारा निर्मिती ग्राम एकता जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच दीपक इंगळे, गुणसागर इंगळे, राजकुमार मुरलीधर इंगळे, नारायण शेंडे, शेषराव सुरवाडे, सुरेंद्र सुरवाडे, शेषराव सुरवाडे, बाळू अमानकर, शिवाजी अमानकर, प्रमोद इंगळे या शेतकºयांनी सहकार्य केले.  सिंचनात होणार वाढ!यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. तसेच अनेक नद्या दुथळी भरून वाहत आहेत. त्यामुळे भंडारज बु. येथील मोहाडी नाल्यावर बांधलेल्या बंधाºयात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे. परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. तसेच जलपातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाई दूर होणार असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाJalyukt Shivarजलयुक्त शिवारagricultureशेती