शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरी घोटाळ्यात  अधिकारी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:18 IST

अकोला: लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना काही गावांमध्ये मंजुरी देणाऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अभियंते, कर्मचाºयांना वाचवण्याच्या हालचाली रोजगार हमी योजना विभागाच्या प्रभारी अधिकारी कार्यालयात सुरू आहेत.

अकोला: लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना काही गावांमध्ये मंजुरी देणाऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अभियंते, कर्मचाºयांना वाचवण्याच्या हालचाली रोजगार हमी योजना विभागाच्या प्रभारी अधिकारी कार्यालयात सुरू आहेत. डिसेंबर २०१७ पासून सुरू असलेल्या या गुºहाळात प्रभारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांच्याकडून कोणतीच कारवाई झालेली नाही.गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देत लाभार्थींची फसवणूक करण्यात आली. सोबतच शासकीय योजनेत घोळ करून निधीचा गैरवापरही झाला. हा प्रकार पातूर, बाळापूर पंचायत समितीमध्ये घडला आहे. बाळापूर तालुक्यात सिंचन विहिरींसाठी ६४५ लक्ष्यांक असताना ९२४ लाभार्थींना मंजुरी आदेश देण्यात आला. पातूर तालुक्यातही तोच प्रकार घडल्याचे पुढे आले. अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी देणारे तत्कालीन गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी १८ मार्च २०१८ रोजी दिले होते. त्यावर काही दिवसांपूर्वी दोन्ही पंचायत समितीमधील ४१ ग्रामसेवकांवर दोषारोप पत्र बजावण्यात आले. त्याचवेळी दहा महिने उलटले तरीही जबाबदार अधिकाºयांवर काय कारवाई केली, याची माहिती रोजगार हमी योजना कक्षाचे प्रभारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांच्याकडून दिली जात नाही. ती गुलदस्त्यात ठेवली जात आहे.

कारवाईच्या टप्प्यात असलेले अधिकारीसिंचन विहिरी घोटाळ््यात जबाबदारी निश्चित होणाºयांमध्ये पातूर पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकाºयांमध्ये जी.के. वेले, एम.बी. मुरकुटे, डॉ. उमेश देशमुख, कृषी अधिकारी विनोद शिंदे यांची नावे असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबतच कनिष्ठ अभियंता सय्यद गणी यांच्यासह किमान ९ ते १० अधिकारी-कर्मचाºयांवरही कारवाई अटळ आहे. मात्र, रोहयो कक्षाचे प्रभारी अधिकारी कुळकर्णी असेपर्यंत ही कारवाई होणार नसल्याचे लोकमतने आधीही प्रसिद्ध केले आहे.विशेष म्हणजे, पातूर पंचायत समितीमधून बदली झाल्यानंतर कार्यमुक्त होण्यापूर्वी तत्कालीन गटविकास अधिकारी एम.बी. मुरकुटे यांनी विहिरींना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिल्याचे स्वत:च्या स्वाक्षरीचा आदेश रद्द केला. त्यामुळे विहिरी मंजुरीत घोळ झाल्याचे निश्चित आहे. तरीही जिल्ह्यातील ४१ ग्रामसेवकांनाच नोटीस देऊन अधिकाºयांना वाचवण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत सुरू असल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद