शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

अकोला जिल्ह्यात सिंचन क्षेत्र घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 16:57 IST

पाटबंधारे विभागाने यावर्षी ३५ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजनही केले; परंतु शेतकऱ्यांकडून अपेक्षित मागणी नसल्याने काटेपूर्णा धरणांतर्गत यावर्षी अर्धेही सिंचन होणार नसल्याचे वृत्त आहे.

अकोला: जिल्ह्यात गतवर्षी चांगला पाऊस झाला असून, सर्व प्रकल्प तुडुंब भरल्याने यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी ३५ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजनही केले; परंतु शेतकऱ्यांकडून अपेक्षित मागणी नसल्याने काटेपूर्णा धरणांतर्गत यावर्षी अर्धेही सिंचन होणार नसल्याचे वृत्त आहे. या धरणातून आजमितीस दररोज १३० क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ एक हजार हेक्टर क्षेत्राला पाणी सोडण्यात आले आहे.गतवर्षी सर्वच धरणात स्थिती वाईट असताना, यावर्षी पावसाने जिल्ह्याला तारले असून, सप्टेंबर महिन्यापासून सतत व दमदार पाऊस पडला. परतीच्या पावसाने त्यामध्ये आणखी भर घातल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले. अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातूनही यावर्षी पाण्याचा विसर्ग करावा लागला. आजमितीस काटेपूर्णा धरणात ८६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा, निर्गुणा, उमा प्रकल्प तसेच घुंगशी बॅरेजमध्ये जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता होती. तथापि, यावर्षी उशिरा पाणी सोडण्यात आले आहे.काटेपूर्णा प्रकल्पांतर्गत ८ हजार ३२५ हेक्टरवर क्षेत्र असून, या क्षेत्राला सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, आजमितीस केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रापर्यंतच पाणी पोहोचले आहे. वान प्रकल्पातून सिंचन करण्यावर भर देण्यात आला आहे. अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात आजमितीस प्रकल्पातून अनुक्रमे दररोज ३० व ५० क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. उमा धरणांतर्गत २,२४१ हेक्टर लाभ क्षेत्र आहे. तथापि, या धरणाच्या क्षेत्रातही १ हजार हेक्टर सिंचन होण्याची शक्यता आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३५ हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित आहे; परंतु यावर्षी ४ हजार हेक्टरच सिंचन होईल, असे एकूण आजचे चित्र आहे.

 अकोला उपविभागांतर्गत सिंचनअकोला उपविभागांतर्गत आता ९ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. या उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा, विश्वमित्री, दगडपारवा, पातूर, तुळजापूर, सावरगाव, गावंडगाव, भिलखेड, धारू ची, चिचपाणी आदी १० ते १२ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांत आजमितीस ६१ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे; परंतु सिंचनासाठी डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

काटेपूर्णा धरणातून सिंचनाला पाणी सोडणे सुरू आहे. मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येत आहे; परंतु बहुतांश शेतकºयांकडे कापूस, तूर पीक आहे. ते काढून दुसरे पीक घ्यावे लागणार आहे.- अभिजित नितनवरे,सहायक अभियंता श्रेणी-१काटेपूर्णा प्रकल्प,बोरगाव मंजू, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण