शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता नाहीच!

By admin | Updated: March 4, 2016 02:03 IST

जिगाव प्रकल्पाला मिळाली केंद्र शासनाची मान्यता.

राजरत्न सिरसाट/अकोला वर्‍हाडातील पाच जिल्हय़ांतील सिंचन प्रकल्पांना अद्याप सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने शेकडो प्रकल्पांची कामे रखडली आहेत. बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव प्रकल्पाला मात्र केंद्र शासनाने सोमवारी मान्यता दिल्याने, या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.विदर्भातील अर्धवट सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी किमान पाच हजार कोटींची गरज आहे. गतवर्षी राज्य शासनाने ३२00 कोटी रुपये निधी मंजूर केला होता; परंतु संपूर्ण विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता हा निधी अपुरा असल्याने विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम आहे. मागील महिन्यात मोजक्या सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता मिळाली. यात पश्‍चिम विदर्भातील केवळ वाशिम जिल्हय़ातील एक-दोन प्रकल्पांचा समावेश आहे; परंतु वेळ निघून गेल्याने या प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे अशक्य आहे.पश्‍चिम विदर्भाचा (वर्‍हाड) विचार केल्यास सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने २ लाख ४७ हजार हेक्टर सिंचन अनुशेष कायम आहे. संपूर्ण विदर्भात १४ मोठे, ३३ मध्यम प्रकल्पांच्या कामांना पुरेसा निधी नसल्याने बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव या मेगा प्रकल्पाच्या कामासाठी आर्थिक रसद कमी पडत आहे; परंतु २९ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाच्या पुढील बांधकामासाठी केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने (टेक्निकल अँडव्हायजरी कमिटी) मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुढील बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या समितीने मान्यता दिल्याने केंद्र शासनाच्या वेगवर्धित यादीनुसार केंद्राचा निधी मिळणार असल्याचा विश्‍वास जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना आहे. जिगाव प्रकल्प पूर्ण झाल्यास एक लाख हेक्टरपर्यंत या भागात सिंचन होईल. दरम्यान, या प्रकल्पाच्या बांधकामास सातत्याने विलंब होत गेल्याने या प्रकल्पाची किंमत आजमितीस ५ हजार ७0८ कोटींपर्यंत पोहोचली आहे. अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, काटेपूर्णा, घुंगशी, उमा बॅरेजेसची कामे अर्धवटच आहेत. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाची पाटचार्‍याची कामे रखडली आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार पश्‍चिम विदर्भातील १0२ प्रकल्प अनुशेष कार्यक्रमात टाकले आहेत. विदर्भासह या सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता हवी आहे.