शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अनियमितता चव्हाट्यावर; पेट्रोल पंप ‘सील’; जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 14:28 IST

अकोला : शहरातील दीपक चौक परिसरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच सुरू असलेल्या इंडियन आॅइलच्या प्राइड सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर विविध घोळ असल्याचे चव्हाट्यावर आल्याने, पेट्रोल पंप ‘सील’ करण्यात आले.

अकोला : शहरातील दीपक चौक परिसरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच सुरू असलेल्या इंडियन आॅइलच्या प्राइड सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर विविध घोळ असल्याचे चव्हाट्यावर आल्याने, पेट्रोल पंप ‘सील’ करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून ही धडक कारवाई केली. या प्रकरणात रामदासपेठ पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप चालक फिरोजअली अजगर अली, भागीदार सिमरनजितसिंह नागरा यांच्या विरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच असलेल्या इंडियन आॅइल कार्पोरेशनच्या प्राइड सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर अनेक प्रकारचा घोळ असल्याची गोपनीय तक्रार जिल्हाधिकाºयांकडे प्राप्त झाली होती. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह महसूल, पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा अग्निशामक विभाग, नगररचना, महावितरण, भूमी अभिलेख व पोलीस विभागाच्या अधिकाºयांनी शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपवर छापा टाकला. संबंधित अधिकाºयांमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत पेट्रोल पंपवर विविध स्वरूपाचे घोळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे इंडियन आॅइल कार्पोरेशनचे अधिकारी गणपती भट यांनी पेट्रोल पंप ‘सील’ केले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शैलेश सपकाळ, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास पाटील यांच्यासह मनपा, महसूल व पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाºयांनी ही कारवाई केली. पेट्रोल पंपवर आढळून आलेल्या अनियमिततासंदर्भात संबंधित विभागामार्फत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पेट्रोल पंपाचा संचालक फिरोज अली अजगर अली आणि भागीदार सिमरनजितसिंह नागरा यांच्याविरूद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा एमआरटीपी अ‍ॅक्ट कलम ५२, ईसी अ‍ॅक्ट, जीवनावश्यक वस्तू अधिनियम, अग्नीशमन कायदा, भूमिअभिलेख कायदा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय संतोष आघाव, राजपालसिंह ठाकूर, दिनकर धुरंधर, हरिदास सोनोने यांनी केली. (प्रतिनिधी)

तपासणीत असा आढळून आला घोळ!पेट्रोल पंपाच्या तपासणी करताना अधिकाºयांना विविध प्रकारचा घोळ असल्याचे आढळून आले. त्यामध्ये बांधकामासाठी नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आली नाही, भाडेपट्टापेक्षा (लीज) जास्त जागा ताब्यात घेण्यात आली, सिलेंडरचा अवैध वापर, अतिक्रमण तसेच असुरक्षितता व अस्वच्छता अशा प्रकारच्या अनियमितता आढळून आल्या.

पेट्रोल पंपावरून ७ सिलिंडर जप्तपेट्रोल पंपावर कारवाईदरम्यान पाच व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि दोन घरगुती गॅस सिलिंडर आढळून आली. पोलिसांनी सर्व गॅस सिलिंडर जप्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयPetrol Pumpपेट्रोल पंपRevenue Departmentमहसूल विभाग