शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

झुकलेले रोहित्र अपघातास निमंत्रण

By admin | Updated: June 8, 2014 00:55 IST

हिंगणा (निंबा) येथे मुख्य वीज वाहिनीचे रोहित्र आणि गावातील वीज खांब पूर्णपणे झुकले आहेत.

निंबा: येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणा (निंबा) येथे मुख्य वीज वाहिनीचे रोहित्र आणि गावातील वीज खांब पूर्णपणे झुकले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असताना आणि त्यांची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कं पनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. हिंगणा निंबा येथे वीज पुरवठा करणार्‍या मुख्य वाहिनीचे रोहित्र पूर्णपणे झुकले असून, गावातील वीज खांबही मोठ्या प्रमाणात झुकले आहेत. झुकलेल्या खांबावरील थ्री फेज वीज तारा कैलास यशवंत तायडे यांच्या घरावर अवघ्या ४ ते ५ फूट अंतरावर लोंबकळत असून, त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या वीज तारा व्यवस्थित करण्यासाठी वीज वितरणकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली, तरी कारंजा रमजानपूर येथील वीज वितरण कार्यालयाकडून ६ महिन्यांपासून दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. दुसरीकडे रोहित्र झुकल्यामुळे त्या खांबावरून जाणार्‍या वीज ताराही मोठ्या प्रमाणात झुकल्यामुळे शेतात काम करणार्‍या शेतमजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याकडेही वीज वितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. एखादवेळी मोठा अपघात होऊन गोरगरीब मजुराचा त्यामध्ये बळी गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि एखाद्याचा बळी गेल्यावरच वीज वितरण दुरुस्तीचे काम करणार काय, असे प्रश्न संतप्त ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून दुरुस्तीचे काम तत्काळ के ले नाही तर परिसरातील जनता वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन क रण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)