शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळय़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:29 IST

अकोला: शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन कागदोपत्री हडपण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हे आदेश सोमवारी दिले आहेत.

ठळक मुद्देपाठपुरावा लोकमतचाअनेकांची नावे येणार समोर

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन कागदोपत्री हडपण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हे आदेश सोमवारी दिले आहेत. अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला आहे. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बी. डी. काळे यांनी तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले. एका कर्मचार्‍याची विभागीय चौकशी सुरू केली आहे, अशातच आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले असून, तपासही आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

ठाणेदार जुमळेंनी केली कुंडली गोळाभूखंड घोटाळय़ाची तक्रार झाल्यानंतर सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी योग्यरीत्या तपास करीत यामध्ये सहभागी असलेल्या अनेकांची कुंडली गोळा केली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात दोषी असलेल्या भूमाफियांसह या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाई होणार आहे. सदर प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे करणार असल्याची माहिती आहे.

भूखंड घोटाळय़ात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच कर्मचारी व अधिकारी दोषी असून, भूखंड बळकावणारा माफिया मुख्य आरोपी आहे. त्यामुळे या सर्वांवर तातडीने कारवाई करण्यासाठी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक