शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलांच्या बांधकामांची चौकशी

By admin | Updated: July 31, 2015 01:55 IST

अकोला जिल्हाधिका-यांचा जिल्हा क्रीडा अधिका-यांना आदेश.

अकोला: जिल्ह्यातील 'तालुका क्रीडा संकुलांचा खेळखंडोबा' या 'लोकमत'ने सुरू केलेल्या वृत्तमालिकेची गंभीर दखल घेत, तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामांची चौकशी करून, बांधकामातील गैरप्रकाराला जबाबदार असणार्‍यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्हा क्रीडा अधिकार्‍याला दिला. तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामातील गैरप्रकाराला जबाबदार असणार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य व्हावे, नागरिकांनी व्यायाम, खेळाची आवड जोपासावी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दज्रेदार कामगिरी बजावणारे खेळाडू निर्माण करण्यासाठी तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याची योजना शासनामार्फत राबविली जात आहे. २६ मार्च २00३ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यापैकी आकोट, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा व पातूर इत्यादी पाच तालुका स्तरावर तालुका क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला सन २00४-0५ पासून सुरुवात करण्यात आली. या पाच तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून २ कोटी ३५ लाखांचा निधी जून २0१५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आला. त्यामध्ये आकोट आणि तेल्हारा येथील तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामांमध्ये बहूद्देशीय सभागृहसह (इनडोअर हॉल) इतर सुविधांच्या कामात प्रचंड अनोगोंदी झाली. इनडोअर हॉल व कार्यालय इमारतींचे बांधकाम निकृष्ट झाले आहे. यासंदर्भात खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या तीन सदस्यीय पथकाकडून करण्यात आलेल्या तपासणीत दोन्ही क्रीडा संकुलांचे इनडोअर हॉल वापर करण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे या दोन्ही क्रीडा संकुलांच्या इमारतींचे बांधकाम उद्घाटनापूर्वीच नापास ठरल्याचे स्पष्ट झाले. तसेच दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली आकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी व पातूर येथील तालुका क्रीडा संकुलांची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. सन २0११ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेली तालुका क्रीडा संकुलांची कामे संथगतीने सुरू असल्याच्या स्थितीत अद्यापही अपूर्णच आहेत.