शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आसिफ खानच्या रेशन दुकानाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:11 IST

अकोला: बुलडाणा जिल्हय़ात धान्याचा काळाबाजार झाल्याप्रकरणी आसिफ खान यांची मेहकर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पुरवठा अधिकार्‍यांनी वाडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार तसेच माजी सरपंच आसिफ खान यांच्या दुकानातील धान्याची चौकशी केली. 

ठळक मुद्दे मेहकर पोलिसांच्या चौकशीनंतर पुरवठा विभाग कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बुलडाणा जिल्हय़ात धान्याचा काळाबाजार झाल्याप्रकरणी आसिफ खान यांची मेहकर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पुरवठा अधिकार्‍यांनी वाडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार तसेच माजी सरपंच आसिफ खान यांच्या दुकानातील धान्याची चौकशी केली. या चौकशीनंतर बाळापूर तहसीलदार यांनी अहवाल तयार केला आहे. काळाबाजारात जाणारा गव्हाचा ट्रक मेहकर पोलीस व तहसीलदारांनी गत काही दिवसांपूर्वी पकडला होता. या ट्रकमधील गहू हा काळाबाजारात जात असल्याची खात्री होताच मेहकर पोलिसांनी ट्रकचालकासह बुलडाणा जिल्हय़ातील दोघांविरुद्ध व वाशिम येथील एका धान्य माफियाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले होते. या आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता वाडेगाव येथील माजी सरपंच आसिफ खान यांच्याशी त्यांचा संपर्क आल्याचे समोर आले होते.:त्यामुळे  आसिफ खान यांची मेहकर पोलिसांनी चौकशी केली होती. या सर्व प्रकारामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी बाळापूर तहसीलदार दीपक पुंडे यांना आसिफ खान यांच्या वाडेगाव येथील दुकानाची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षण अधिकार्‍यांनी खान यांच्या दुकानाची चौकशी केली व तसा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला; मात्र अद्याप हा अहवाल तहसीलदार यांच्याकडे आला नसल्याची माहिती आहे.

पोलिसांकडूनही दुर्लक्ष रेशन व शालेय पोषणच्या धान्याचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू असून, याकडे अकोला पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. मेहकर पोलिसांनी पातूर तालुक्यामधून माहिती मिळाल्यानंतर या गव्हाचा ट्रक पकडला होता; मात्र अकोला पोलिसांना काळाबाजार करणार्‍या माफियांवर मेहेरनजर ठेवल्याचे दिसून येते. अकोल्यात मोठय़ा प्रमाणात हा घोटाळा सुरू असताना याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.अमरावती येथील एका मोठय़ा कंत्राटदाराकडून धान्याचा काळाबाजार करण्यात येत आहे. यामध्ये अनेक बड्या व्यक्तींचे हात असल्याने महसूल प्रशासन मूग गिळून बसले आहे. चिमुकल्या मुलांचा व गरिबांचा घास हिसकणार्‍या या मोठय़ा कंत्राटदारावर पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात पुरवठा विभागातील सेवानवृत्त कर्मचार्‍यांसह अनेकांचे हात ओले असून, पोलिसांनी सखोल तपास केल्यास बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.