शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी ७५ लाखांच्या साहित्य वाटपाची चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2017 05:53 IST

समितीच्या सभेत चर्चा; विशेष घटक योजनेचीही चौकशी.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्यावर्षी प्राप्त साहित्य लाभार्थींंना परस्पर वाटप केल्याची चौकशी करण्यासोबतच अकोट तालुक्यात विशेष घटक योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील चौघांना दिल्याप्रकरणीही फौजदारी कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पत्रातून केली जाणार आहे. या दोन्ही मुद्यांवर जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शुक्रवारी चर्चा झाली.सभापती माधुरी विठ्ठलराव गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदस्य रमण जैन, शोभा शेळके, हिंमतराव घाटोळ, चंद्रशेखर पांडे गुरुजी, विलास इंगळे, शबाना खातून सैफुल्लाखा यांच्यासह कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे उपस्थित होते. कृषी विभागाच्या गेल्या वर्षीच्या योजनांचे साहित्य पंचायत समिती स्तरावर पडून आहे. ते त्याच तालुक्यातील लाभार्थींंना वाटप करावे, सर्वच तालुक्यांत शिल्लक असलेले साहित्य अवैधपणे लाभार्थींंना परस्पर वाटप केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामध्ये सबर्मसिबल पंप, कडबा कटर, पाइप, ग्राइंडर कम पल्वरायजर, मनुष्यचलित पेरणीयंत्रांचा समावेश आहे. गेल्या काळात तीन कोटी ७५ लाख रुपये खर्चातून योजनांचे साहित्य प्राप्त झाले; मात्र त्याचे लाभार्थी कृषी विभागाने परस्पर ठरविले, असे रमण जैन यांनी म्हटले. विशेष घटक योजनेतून बैलगाडी, बैलजोडीचा लाभ देण्यासाठी अकोट तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांची निवड झाली, हा गंभीर प्रकार आहे. त्याची चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याच्या चर्चेसोबतच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र देण्याचे सभापती गावंडे यांनी सांगितले. जिल्हय़ातील ग्रामपंचायतींमध्ये अपारंपरिक ऊर्जा विभागाकडून ५0 लाखांच्या खर्चातून सौरदिवे दिले जाणार आहेत, त्यासाठी प्रस्ताव मागवण्याचे ठरले.