शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होणार ऑनलाईन पद्धतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST

अकोला : दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट उभे ...

अकोला : दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट उभे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा आलेख घसरला असला, तरीही संकट कायमच आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन शहरात जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शहारातील योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थांमध्ये ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. गत पाच हजार वर्षांहून अधिक परंपरा असणारी योग कला ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. गतवर्षापासून कोरोनाच्या संकटाने जनजीवन विस्कळीत बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन व आरोग्याच्यादृष्टीने सक्षम समाज निर्माण व्हावा, ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, पतंजली योग समिती, योगासन सांस्कृतिक मंडळ, अजिंक्य फिटनेस पार्क, क्रीडा भारती, प्रजापिता ब्रम्हाकुमारी, भारत स्वाभिमान संघ व विविध योग संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २१ जून रोजी सकाळी ७ ते ८ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक आयोजित केले आहे.

------------------------------

कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिन हा ऑनलाईन पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन लिंक जारी केली असून, या लिंकद्वारे कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून प्रात्यक्षिकाद्वारे योगाचे आयोजन केले आहे. या क्रार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.