शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या कृषी विद्यापीठात उद्यापासून आंतराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद

By admin | Updated: December 3, 2014 00:28 IST

१२ देशांतील शेतकरी, तज्ज्ञ उपस्थित राहणार.

अकोला : फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनल, या शेतकर्‍यांसाठी जागतिक स्तरावर काम करणार्‍या संस्थेने १४ वा आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद भारतात आयोजित केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या आयोजनाचा बहुमान मिळाला असून, ४ ते ७ डिसेंबर दरम्यान हा परिसंवाद येथे होणार आहे. कृषी विद्यापीठासह डॉ. पंजाबराव देशमुख अँग्रिकल्चरल फाऊंडेशन आणि मुंबई येथील नैराबजी रतन टाटा ट्रस्ट यांचा या आयोजनामध्ये सहभाग आहे. आंतराष्ट्रीय महिला सबलीकरण वर्षाचे औचित्य साधून ह्यशेतकरी महिलांचे सबलीकरण आणि उत्पन्नवाढीचे तंत्रज्ञानह्ण या विषयावरील आंतराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी होणार आहे. जागतिक हवामान बदल, खुली अर्थव्यवस्था व निसर्गचक्रातील विरोधाभास सहन करीत, देशाला कृषिप्रधानतेचा दर्जा देणार्‍या शेतकरी वर्गाला कृषिक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय घडामोडी, तंत्रज्ञान अगदी सहजतेने समजून घेण्यासाठी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी या आंतराष्ट्रीय परिसंवादासाठी पुढाकार घेतला आहे. या परिसंवादामध्ये ऑस्ट्रेलिया, फ्रांस, युनायटेड किंगडम, टांझानिया, केनिया, युगांडा, उझबेकीस्तान,अमेरिका, इस्त्राईल, कॅनडा, दक्षिण कोरिया आदी देशांमधून जवळपास ३0 शेतकर्‍यांसमवेत एकूण ५५ भारतीय शेतकरी सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी १0 वाजता कृषी महाविद्यालयाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात परिसंवादाचे उद्घाटन होईल. एकूण सात सत्रांमध्ये विविध कृषितट्ठज, शेतकरी तसेच शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. यासह कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र आणि प्रगतिशील शेतकर्‍यांच्या शेतावर भेटी दिल्या जाणार आहेत. या परिसंवादात राज्यातून येणार्‍या शेतकर्‍यांसाठी खुले चर्चासत्र ७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत याच सभागृहात पार पडणार आहे.