शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

आंतरजिल्हा बदलीत आलेल्या शिक्षकाला परस्पर दिली नियुक्ती!

By admin | Updated: September 14, 2016 02:15 IST

बीडीओ वेले यांचा प्रताप; सीईओंनी दिली ‘शो कॉज’.

अकोला, दि. १३ : जिल्हाभरात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा गोंधळ सुरू असतानाच बाळापूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी वेले यांनी आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकाला परस्पर नियुक्ती देण्याचा प्रकार केला आहे. ही बाब सोमवारी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला असून, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण विधळे यांनी वेले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हाभरात सध्या माध्यमिक विभागाचे ११९ तर, प्राथमिक विभागात १३ खासगी शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सध्या वेगात आहे. अशा स्थितीमध्ये बाळापूरचे तत्कालीन व आताचे अकोला गटविकास अधिकारी वेले यांनी नांदेड जिल्हय़ातून बदलून आलेल्या एका शिक्षकाला बाळापूर पंचायत समितीमध्ये परस्पर रुजू करून घेतले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेला कुठलीही माहिती वेले यांनी दिली नाही. मुख्यमंत्री १६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेणार आहेत. त्यानिमित्ताने सोमवारी जिल्हाधिकारी जी. ङ्म्रीकांत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा सर्व प्रकार समोर आला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी चांगलेच संतप्त झाले. संबंधित बीडीओंची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले. *जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती न देता आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकाला परस्पर नियुक्ती देण्याचा प्रकार गंभीर असून, यासंदर्भात बीडीओंना शो कॉज बजावण्यात आली आहे. -अरुण विधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला.