शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदली प्रकरणात अकोला जिल्हा परिषदेला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:12 IST

अकोला: आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रुजू न केल्याने त्या शिक्षकांना देय वेतनाची पन्नास टक्के रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली.

- सदानंद सिरसाटअकोला: आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रुजू न केल्याने त्या शिक्षकांना देय वेतनाची पन्नास टक्के रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली. २९ शिक्षकांच्या वेतनापोटी ११ लाख ४० हजार रुपये २६ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा परिषदेने न्यायालयात जमा केले आहेत. उद्या मंगळवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होत आहे.शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या शासन स्तरावरून करण्याचे धोरण शासनाने फेब्रुवारी २०१७ पासून सुरू केले. पहिल्याच टप्प्यात शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन प्राप्त अर्जानुसार बदल्या केल्या. जिल्हा परिषदेत आधीच ४८ पेक्षाही अधिक शिक्षक अतिरिक्त असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे आंतरजिल्हा बदल्या करीत ती संख्या प्रचंड वाढविली. त्यानंतर शासनाने अकोला जिल्ह्यात आॅनलाइन आंतरजिल्हा बदली केलेल्या शिक्षकांच्या यादीनुसार येणारे ३४ शिक्षक अतिरिक्त ठरले. त्या सर्वांना रुजू करून घेतल्यास आधीचे ४८ आणि ३४ मिळून ८२ शिक्षक अतिरिक्त ठरले. आंतरजिल्हा बदलीतील ३४ शिक्षकांना आधी समानीकरणाने रुजू करून घेण्याचे सांगण्यात आले.- चौकशी टाळण्यासाठी शिक्षकांना पाठवले परतआधीच आंतरजिल्हा बदलीनुसार नियमबाह्यपणे रुजू करून घेतल्याने ४८ शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यातून बिंदूनामावलीमध्ये प्रचंड घोळ झाला. त्यानंतर आलेल्या ३४ शिक्षकांना रुजू केल्यास अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. आधीच्या रुजू करून घेण्याची चौकशी सुरू आहे. त्यातच या शिक्षकांना रुजू केल्यास पुन्हा अधिकारी-कर्मचाºयांची चौकशी होईल, त्यामुळे त्यांना रुजू करून घेतले नाही, असा पवित्रा शिक्षण विभागाने घेतला आहे.२९ शिक्षकांची न्यायालयात धावपरत पाठवलेल्या ३४ पैकी ५ शिक्षक मूळ जिल्हा परिषदेत रुजू झाले, तर २९ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्या शिक्षकांच्या वेतनाची रक्कम न्यायालयात जमा करताना २९ शिक्षकांनी शासन आदेशाचा अवमान केल्याचेही जिल्हा परिषदेने न्यायालयात नमूद केले आहे.

अधिकाºयांनी लाटला मलिदा, जिल्हा परिषदेला फटकाजिल्हा परिषदेत २०१२ नंतर रुजू झालेल्या काही मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मलिदा लाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने रुजू करून घेतले. काही शिक्षकांच्या फायली तर परस्पर चालवून त्यांना पदस्थापना देण्याचा चमत्कारही घडला. याप्रकरणी तत्कालीन सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह शिक्षणाधिकारी, कर्मचाºयांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदHigh Courtउच्च न्यायालय