शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

मध्यवर्ती बस स्थानकावर रात्री प्रवाशांची घालमेल

By admin | Updated: May 27, 2014 19:30 IST

अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीच्या वेळेस प्रवाशांची घालमेल असल्याचे दिसून येते.

अकोला : उन्हाळ्याची सुटी आणि लग्नसराईमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना फार गर्दी वाढली आहे. अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीच्या वेळेसदेखील हीच स्थिती कायम असल्याचे दिसून येते. रात्री १0 नंतर प्रवास करणार्‍या नागरिकांना अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर गाड्यांबाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने त्यांची घालमेल होत असल्याचे दिसून येते.सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असून, पालक वर्ग व बच्चे कंपन्यांनी मिळून नियोजित स्थळी जाण्यासाठी प्रवासाला निघत आहेत. त्यातच मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असल्याने लग्न कार्य अटेंड करण्याची एक वेगळीच घाई बस स्थानकावर दिसून येते. भर दिवसा उन्हाचा तडाखा सहन करण्याऐवजी अनेक जण रात्रीचा प्रवास करणे पसंत करीत असल्याने अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर रात्रीसुद्धा प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे. रात्री १0 नंतर येणार्‍या जाणार्‍या गाड्यांची उद्घोषणा होत नसल्याने अक्षरश: फलाटांवर उभे असलेले प्रवासी स्थानकात प्रवेश करणारी गाडी कोणती, हे पाहण्यासाठी तिच्या दिशेने तुटून पडतात. बाहेरगावाहून अकोला मार्गे जाणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्यास, त्याबाबत अलीकडच्या बस स्थानकावर चौकशी करण्याऐवजी त्या किती वाजता अकोला बस स्थानकावर आल्या आणि गेल्या केवळ एवढ्यापुरतेच काम येथील रात्रपाळीचे अधिकारी करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. नादुरुस्त झालेल्या एखाद्या लांब पल्ल्याच्या गाडीला पर्याय म्हणून एकही शिल्लक गाडी अकोला विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांना सुविधा देण्यास एसटी महामंडळ असमर्थ ठरत असल्याचे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)** चौकशी अधिकर्‍यांशी वादअकोला मध्यवर्ती बस स्थानकावर रात्री येणार्‍या बहुतांश गाड्या चालकांकरवी फलाटांवर लावण्याऐवजी इतरत्र लावल्या जातात. यामुळे बरेचदा फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना आलेली बस कोणती, हे अखेरपर्यंत कळत नाही. अशा वेळी गाडी चुकल्याने चौकशी अधिकार्‍याशी वाद घालण्यापलीकडे प्रवाशांसमोर दुसरा पर्याय उरत नाही. **  सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरीमध्यवर्ती बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमार्फत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतात. दिवसा चार पुरुष व दोन महिला, तर रात्रीच्या वेळेसे दोनच पुरुष सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. सुरक्षा चोख ठेवण्यासाठी ही संख्या कमी असल्याने गर्दीच्या काळात पाकीटमारांचे फावते.