शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अकोला रेल्वेस्थानकावर लागणार 'इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:08 IST

अकोला : विमानतळासारखी सुरक्षा देशातील रेल्वेस्थानकांना देण्यासाठी देशभरातील २०२ रेल्वेस्थानकांवर इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम (आयएसएस) लावण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली असून, या २०२ रेल्वेस्थानकांमध्ये अकोला रेल्वेस्थानकाचा समावेश आहे.

अकोला : विमानतळासारखी सुरक्षा देशातील रेल्वेस्थानकांना देण्यासाठी देशभरातील २०२ रेल्वेस्थानकांवर इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम (आयएसएस) लावण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली असून, या २०२ रेल्वेस्थानकांमध्ये अकोला रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. आयएसएस प्रकल्पात भुसावळ विभागातील मनमाड, नाशिक, भुसावळ, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. आयएसएस प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याने अनेक प्रवाशांचे याकडे लक्ष लागले आहे.अलाहाबाद येथील कुंभमेळ्याच्या निमित्ताने रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी विमानतळाच्या धर्तीवर रेल्वेस्थानकांनादेखील कडेकोट सुरक्षा देण्याचा प्रकल्प अस्तित्वात येत असल्याची घोषणा केली. देशातील मोठ्या जंक्शन रेल्वेस्थानकांवर ही सुरक्षा लावली जाणार असून, यासाठी २०२ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. २६/११ च्या घटनेनंतर घातपाताच्या घटनांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने ही सुरक्षा लावली जाणार आहे. ज्याप्रमाणे विमानतळावर दोन तास आधी पोहोचणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे रेल्वेस्थानकांवर २० मिनिटे आधी पोहोचले बंधनकारक राहणार आहे. जे प्रवासी वेळेच्या आत पोहोचणार नाही, त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास नाकारला जाऊ शकतो. विशिष्ट चेकपोस्ट एन्ट्रीतूनच प्रत्येक प्रवाशांना जावे लागेल. त्यामुळे इतरांना या लाइनमधून येणे कठीण होणार आहे. या तपासणीसाठी वेळ जाणार असल्याने आता रेल्वेस्थानकावर वेळेवर गाडी पकडणे शक्य होणार नाही. तपासणीच्या ठिकाणी बॉम्ब डिसेक्शन आणि त्यास निष्क्रिय करणारे पथक, आरपीएफ जवान कार्यरत राहतील. व्यक्ती आणि सामानाची येथे कसून तपासणी केली जाणार आहे. संशय येताच गेटबंद करून संबंधित व्यक्तीला तातडीने ताब्यात घेण्यात येईल. सोबतच या तपासणीची सीसी कॅमेराद्वारे रेकॉर्डिंगही होणार आहे. हायटेक अद्ययावत यंत्रणेने होणाऱ्या या तपासणीच्या प्रकल्पासाठी ३८५.०६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

 मध्य रेल्वेच्या या स्थानकांवर राहील ‘आयएसएस’!मध्य रेल्वेच्या उपरोक्त सहा स्थानकांसह नागपूर, पुणे, मिरज, सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मिनल, ठाणे आणि कल्याण या रेल्वेस्थानकांवरदेखील आयएसएसचा समावेश आहे. सर्वांत जास्त सुरक्षा भुसावळ डिव्हिजनमध्येच देण्यात येणार आहे.

भुसावळ विभागातील सहा रेल्वेस्थानकांची निवड आयएसएस प्रकल्पासाठी झाली आहे. सुरुवातीला मुंबई परिसरातील आणि महत्त्वाच्या स्थानकांवर ही सुरक्षा दिली जाईल. याबाबत अद्याप एवढेच निर्देश आलेले आहेत.-जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ डीआरएम कार्यालय. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक