शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गहू, हरभरा पिकासाठी विमा योजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:51 IST

पीक विमा काढण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तर उन्हाळी पिकांसाठी १ एप्रिल २०२० सहभाग घेता येणार आहे.

अकोला : रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तर उन्हाळी पिकांसाठी १ एप्रिल २०२० सहभाग घेता येणार आहे.या योजनेत राज्यात सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पीक कर्ज दराप्रमाणे पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.या योजनेत उंबरठा उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाचे मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न पिकाखालील क्षेत्र आणि चालू हंगामात पुरेसे पीक कापणी प्रयोग घेण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ या बाबी विचारात घेऊन राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने पीकनिहाय विमा क्षेत्र घटक अनुसूचित केलेले आहेत. असे करताना राज्यातील सर्व जिल्ह्यामधील प्रमुख पिके अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. अधिसूचित केलेल्या सर्र्व पिकांसाठी उत्पन्नाचा अंदाज काढण्याचा मानक पद्धतीनुसार आवश्यक तेवढ्या पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना अनिवार्य आहे. गहू, हरभरा व कांदा आदी पिकांसाठी ही योजना लागू आहे. बिगर कर्जदार शेतकºयांनाही ३१ डिसेंबरपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.

जिल्हा समितीजिल्ह्यात पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी भारत एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे.

पीक विमा हप्ताया योजनेत वेगवेगळ््या पिकांसाठी शेतकºयांना वेगवेगळी रक्कम भरावी लागणार असून, बागायती गहू पिकाला हेक्टरी ५२५ रुपये, हरभरा पिकासाठी ३६० रुपये, भुईमुगासाठी हेक्टरी ५७० रुपये तर रब्बी कांद्यासाठी ३,६५० रुपये भरावे लागणार आहेत.

कांदा पिकासाठी या तालुक्याचा समावेशकांदा पिकासाठी अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व बार्शीटाकळी तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, भुईमुगासाठी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बार्शीटकाळी तालुक्यांचा समावेश आहे.

 

रब्बी हंगामासाठी यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, अधिसूचित केलेले तालुके व पिकांसाठी या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत शेतकºयांना विमा प्रस्ताव सादर करता येणार आहे.मोहन वाघ ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोलाagricultureशेती