शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इन्सुलेटर निकामी; मोठा भाग अंधारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:41 IST

विद्युत वाहिन्यांची जीर्ण व जुनी झालेली यंत्रणा महावितरणसह नागरिकांनाही त्रासदायक ठरत असली, तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गुरुवारी मध्यरात्री सुधीर कॉलनी फिडरवरील नागरिकांना याचा प्रत्यय आला. पावसामुळे इन्सुलेटर निकामी झाल्याने सुधीर कॉलनी फिडरवर असलेल्या मोठय़ा भागातील वीजपुरवठा मध्यरात्री १.४५ वाजता खंडित झाला होता. त्यामुळे जठारपेठ, खेळकर नगर, राऊतवाडी, उमरी, जवाहरनगर, सुधीर कॉलनी, रणपिसे नगर यासह मोठय़ा भागातील नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली

ठळक मुद्देजठारपेठ, खेळकर नगरवासीयांनी गुरुवारची रात्र काढली जागूनसुधीर कॉलनी फिडर - मध्यरात्री १.४५ वाजता पासून खंडित होता वीजपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विद्युत वाहिन्यांची जीर्ण व जुनी झालेली यंत्रणा महावितरणसह नागरिकांनाही त्रासदायक ठरत असली, तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गुरुवारी मध्यरात्री सुधीर कॉलनी फिडरवरील नागरिकांना याचा प्रत्यय आला. पावसामुळे इन्सुलेटर निकामी झाल्याने सुधीर कॉलनी फिडरवर असलेल्या मोठय़ा भागातील वीजपुरवठा मध्यरात्री १.४५ वाजता खंडित झाला होता. त्यामुळे जठारपेठ, खेळकर नगर, राऊतवाडी, उमरी, जवाहरनगर, सुधीर कॉलनी, रणपिसे नगर यासह मोठय़ा भागातील नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली.सुधीर कॉलनी फिडरवर जवळपास ५५ ट्रान्सफार्मर असून, या फिडरला उमरी विद्युत उपकेंद्रावरून वीज पुरवठा होतो. गुरुवारी रात्री या भागात अचानक आलेल्या पावसामुळे विद्युत वाहिनीवरील इन्सुलेटर निकामी होऊन वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या संबंधित कर्मचार्‍यांनी रात्री २. ३0 वाजेपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले; परंतु नेमका बिघाड निदर्शनास न आल्यामुळे या फिडरवरील ५ ते ६ ट्रान्सफॉर्मचा वीजपुरवठा रात्रभर खंडित राहिला. यामध्ये खेडकर नगर, जठारपेठ, राऊतवाडी, उमरी, जवाहर नगर, सुधीर कॉलनी या भागांचा समावेश आहे. वीजपुरवठा नसल्याने प्रचंड उकाडा व डासांचा त्रास यामुळे या भागातील नागरिकांना रात्रभर अक्षरश: जागून काढावी लागली. अखेर शुक्रवारी सकाळी १0 वाजेपर्यंत या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

घामाच्या धारा अन् डासांचा उच्छादमध्यरात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील नागरिकांची झोप उडाली. आधीच उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वीज पुरवठा खंडित झाल्याने आणखी भरच पडली. त्यात शहरात सध्या डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. वीज गेल्याने रात्रभर या भागातील नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागला. रात्रभर जीव अगदी मेटाकुटीस आला होता, अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.