शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप, फळे विकण्याची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

मूर्तिजापूर : लॉकडाऊनने भल्याभल्यांना वाट दाखवली. त्यात मोठ्या व्यवसायापासून ते किरकोळ मजूरही भरडले गेले. अनेकांचा यामुळे रोजगार गेला आहे, ...

मूर्तिजापूर : लॉकडाऊनने भल्याभल्यांना वाट दाखवली. त्यात मोठ्या व्यवसायापासून ते किरकोळ मजूरही भरडले गेले. अनेकांचा यामुळे रोजगार गेला आहे, तर कित्येक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकाळात लग्न समारंभात मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली. वाजंत्री व्यवसायाला परवानगी नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सूप, फळे विकण्यासह हात मजुरीची कामे करावी लागत आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहानमोठे व्यवसाय संकटात आले आहेत. याचा परिणाम हात मजुरांनाही भोगावा लागला. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने धुमधडाक्यात लग्न करणाऱ्यांचे मनसुबे पार धुळीस मिळाले आहेत. या कालावधीत विवाह समारंभ मोजकेच पार पडत असल्याने, या समारंभात मुख्य भूमिका असलेल्या वाजंत्री वाजविणाऱ्यांचा व्यवसायसुद्धा ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. परंपरागत व्यवसाय म्हणजे वाजंत्री वाजविणे व बांबू आणि शिंदोळी झाडापासून फळे बनविणे यासाठी कुशल हस्त कारागिरीने ते टोपले, सुप, झाडू, आदी घरगुती कामासाठी लागणाऱ्या विशिष्ट वस्तू बनवतात. परंतु वाजंत्री वाजविणे हा मुख्य व्यवसाय आहे. हाच व्यवसाय गत दीड वर्षभरापासून बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँड व्यवसायाचे संचालकही हतबल झाले असून, त्यांनाही इतर कामे करावी लागत आहेत. काहींनी तर बँडसाठी वापरण्यात येत असलेल्या गाडीवरच आपला टोपले, सूप विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. बँड पार्टीत मजुरी दाखल वाजंत्री वाजविण्याचे काम करीत असणाऱ्या कलाकारांचा हा व्यवसाय बंद पडल्याने उपासमारीची वेळ आली आहे, तर काही इतर किरकोळ मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढून आपली उपजीविका भागवीत आहेत.

शासकीय मदत देण्याची गरज

शासकीय मदत व्हावी

इतर कलावंतांना मानधन म्हणून शासनातर्फे मदत केली जाते. त्याच धर्तीवर आर्थिक उणीव भरून काढण्यासाठी वाजंत्री कलावंतांना अशा संकट काळात तात्पुरती का होईना, आर्थिक मदत करण्याची मागणी वाजंत्री कलावंतांकडून होत आहे.

फाेटो:

वाजंत्रीचा व्यवसायच दीड वर्षांपासून बंद आहे. प्रामुख्याने चार महिने चालणाऱ्या व्यवसायावरच एक वर्ष कुटुंब चालवावे लागते. एका बँड पथकात किमान ३० लोक असतात. यावरच त्यांच्या घरची चूल पेटते. उपासमारीची वेळ आल्याने शासनाने कलावंत म्हणून मदतीचा हात द्यावा.

-नरेंद्र आमटे,

बँड पथक संचालक, मूर्तिजापूर

गत दीड वर्षापासून वाजंत्री व्यवसाय बंद असल्याने वाजंत्री कलावंत हा आर्थिक संकटात सापडला आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा जोडधंदा अथवा व्यवसाय नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी.

- प्रकाश आमटे, संचालक बँड पार्टी, मूर्तिजापूर