शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईओ’ बंगल्यासमोरील गोठा हटविण्याचे निर्देश

By admin | Updated: July 31, 2015 01:51 IST

जिल्हाधिका-यांनी केली गोठय़ांची तपासणी; जप्तीची कारवाई करण्याचा आदेश.

अकोला : शहरातील शासकीय निवासस्थानांचा गुरे-ढोरे पाळण्यासाठी वापर होत असून, शासकीय जमिनीचा गुरे-ढोरे बांधण्यासाठीदेखील गैरवापर करण्यात येत आहे. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी काही ठिकाणी भेट देऊन, शासकीय निवासस्थान परिसरातील गोठय़ांची तपासणी केली. त्यामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या (सीईओ) बंगल्यासमोरील गोठा हटविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच इतर शासकीय निवासस्थानांच्या परिसरातील गोठे व गुरे-ढोरे बांधण्यासाठी शासकीय जमिनीच्या वापराबाबत जप्तीची कारवाई करण्याचा आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.विविध विभागांतर्गत शासकीय सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासाची व्यवस्था म्हणून शहरात विविध ठिकाणी शासकीय निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. अधिकारी व कर्मचार्‍यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थान व परिसराचा वापर नियमानुसार निवासाकरिता होणे अपेक्षित आहे. परंतु, या नियमाची पायमल्ली करीत, शहरातील काही शासकीय निवासस्थानांच्या परिसरात गोठे उभारून, गुरे-ढोरे पाळली जात आहेत. तसेच शासकीय जमिनीचा वापर गुरे -ढोरे बांधण्यासाठी करण्यात येत आहे. यासंदर्भातह्यलोकमतह्णने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'चे वृत्त 'शासकीय निवासस्थाने बनली चक्क गोठे' या शीर्षकाखाली २४ जुलै रोजी प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत शासकीय निवासस्थानांसह शासकीय जागेच्या गैरवापराबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी २७ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला. तसेच ३0 जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील काही शासकीय निवासस्थान परिसराची पाहणी केली. त्यामध्ये जिल्हा परिषद 'सीईओ' बंगल्यासमोर आढळून आलेले गोठे हटविण्याचे निर्देश त्यांनी दिले. इतर शासकीय निवासस्थान परिसरातील गोठे किंवा गुरे-ढोरे बांधण्यासाठी शासकीय जमिनीचा वापर होत असल्यासंदर्भात जप्तीची कारवाई करण्याचा आदेशही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना दिला.