शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मृत बालकाऐवजी जिवंत बालिका दिली आप्तेष्टांच्या ताब्यात!

By admin | Updated: January 15, 2016 02:03 IST

मृत बालक समजून होणार होते जिवंत बालिकेवर अंत्यसंस्कार, अकोला सर्वोपचार रुग्णालयातील घटना

अकोला: सर्वोपचार रुग्णालयामध्ये एका मृत बालकाचा मृतदेह आप्तेष्टांच्या ताब्यात देण्याऐवजी दुसर्‍या एका महिलेची जिवंत मुलगी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे, मृत बालकाचे आप्तेष्ट जिवंत मुलीचाच आपला मुलगा समजून अंत्यसंस्कार करायला घेऊन गेले होते. सुदैवाने मुलीची हालचाल दिसून आल्याने अनर्थ टळला. सर्वोपचार रुग्णालय वेगवेळय़ा घडामोडींनी नेहमीच चर्चेत राहते. शुक्रवारी बालकांची अदलाबदली करून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी कळसच गाठला. ९ जानेवारी रोजी रिसोड तालुक्यातील शेलगाव येथील २१ वर्षीय महिला प्रियंका प्रशांत वाघ ही प्रसूतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली. महिलेने १0 जानेवारी रोजी सकाळी ११.३0 वाजता एका मुलाला जन्म दिला; परंतु मुलाची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला प्री-मॅच्युअर बेबी युनिटमध्ये दाखल केले. तीन, चार दिवस उपचार केल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि बुधवारी मुलाचा मृत्यू झाला; परंतु, याची माहिती प्रियंकाला तिच्या पतीने दिली नाही. प्री-मॅच्युअर बेबी युनिटमधील मृत मुलाला रुग्णालयातील कार्यरत कर्मचार्‍यांनी कापडामध्ये गुंडाळून प्रियंकाच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. कापडामध्ये पूर्णत: गुंडाळलेल्या मुलाला घेऊन नातेवाईक शेलगाव येथे अंत्यसंस्कारासाठी जाण्याकरीता रुग्णवाहिकेने निघाले. दरम्यान, काही नातेवाइकांनी मुलाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मुलाच्या तोंडावरील कापड बाजूला केल्यावर त्यांना डोळय़ांच्या पापण्याची हालचाल होत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी त्यांच्या ताब्यात मृत मुलाऐवजी जिवंत मुलगी ताब्यात दिल्याची बाब समोर आल्याने नातेवाईकांनीही आश्‍चर्य व्यक्त केले. तेथील कर्मचार्‍यांनी मुलीला ताब्यात घेऊना प्री मॅच्युअर बेबी युनिटमध्ये दाखल केले.