शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्पायर अवार्ड मुलांच्या ज्ञानास चालना देणारे माध्यम - डॉ. रवींद्र भास्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 19:39 IST

शिक्षण तज्ज्ञ व इन्स्पायर अवार्ड अकोला जिल्ह्याचे संयोजक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांच्याशी साधलेला संवाद...

- नितीन गव्हाळेलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : २00९ पासून भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान इन्स्पायर अवार्ड योजनेची सुरुवात केली. आता इन्स्पायर अवार्डचे आयोजन राष्ट्रीय नवप्रवर्तन व भारत सहकार्याने केले जात आहे. हा स्टार्टअप इंडियाच्या प्रसारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे येथील शिक्षण तज्ज्ञ व इन्स्पायर अवार्ड अकोला जिल्ह्याचे संयोजक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी सांगितले. त्यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद...

मुलांना सर्वोत्तम बनविण्यासाठी का प्रोत्साहित करावे?सृजनशील, कल्पनाशील मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. संवेदना, सृजनशीलता व सहकार्य ही भावना मुलांना योग्य नागरिक बनवतात; परंतु सर्वच मुलांची क्षमता वेगवेगळी असते. मुलांना सर्वोत्तम बनविण्यासाठी आम्हाला जोर द्यावा लागेल. भविष्यात त्यांचा हाच गुण समाजासाठी उपयुक्त ठरेल. नवाचाराच्या ऊर्जेने देशासाठी रचनात्मक व समावेशक कार्य करू शकतील. त्यासाठी इन्स्पायर अवार्ड मानक भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे संचालित एक विशिष्ट कार्यक्रम आहे. याचा मुख्य उद्देश वर्ग सहावी ते दहावीमधील प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आहे.

इन्स्पायर अवार्ड अंतर्गत अर्ज कसे आमंत्रित केले जातात?इन्स्पायर अवार्र्डस् मानकाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम विचार समाजाच्या दैनंदिन समस्यांचे समाधान करू शकेल. या व्यतिरिक्त घरगुती आणि श्रमिकांचे श्रम कमी करण्याचे उपाय ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच सेवासुद्धा सहज मिळतील.

योजनेचे कार्यान्वयन कशाप्रकारे केले जाईल?मुख्याध्यापकांद्वारे शाळेमध्ये आयडिया स्पर्धेअंतर्गत विद्यार्र्थ्याचे दोन ते तीन सर्वोत्तम विचार निवडले जातील. ज्यांचे नामांकन विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकारच्या वेबपोर्टल (ई-मॅनेजमेंट आॅफ इन्स्पायर अवार्ड स्कीम) वर केले जाईल. नवीन विद्यालय वेबपोर्टल ई-मिलासवर नोंदणी करून शकतात. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान व भारत सरकारतर्फे १ लाख विचारांना निवडले जातील. सर्व विद्यार्थ्यांना १0 हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. दहा प्रकल्पांच्या राज्यस्तरीय प्रदर्शनातून १ हजार प्रकल्पांची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात येईल. यातून ६0 सर्वोत्तम प्रतिकृती राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडल्या जातील.

कल्पनेची स्पर्धा काय आहे?कल्पनेच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापकद्वारा सर्व शालेय मुलांना एकत्र करून त्यांना विचार, नवाचार, जसे की मशीन किंवा गॅझेट जे उपलब्ध नाही; परंतु एखादी मशीन बनवायची जिद्द आहे. कोणत्याही वर्तमान/उपलब्ध असलेल्या यंत्र किंवा गॅझेटमध्ये सुधाराची आवश्यकता आहे. यासाठी शाळेत आयडिया स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रोत्साहन द्यावे.

टॅग्स :Akolaअकोलाscienceविज्ञानinterviewमुलाखत