शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:37 IST

कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत.

ठळक मुद्देमहाविद्यालयांची तपासणी करून ती यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाकडे सादर करावी. एवढेच नाहीतर अतिरिक्त प्रवेश रद्द करण्याचे आदेशात बजावले आहे.

अकोला: यंदाच्या २0१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये अनेक महाविद्यालयांनी मंजूर क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या महाविद्यालयांची तपासणी करून ती यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाकडे सादर करावी. एवढेच नाहीतर अतिरिक्त प्रवेश रद्द करण्याचे आदेशात बजावले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्यास, त्या महाविद्यालयातील अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. आदेशानुसार महाविद्यालयांनी अधिकचे विद्यार्थी प्रवेश रद्द केले नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)शहरी विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात घेतलेले प्रवेश रद्द होणार!शहरात इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात आली होती. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांनी शहरातीलच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता, ग्रामीण भागात प्रवेश घेतले. त्यांचे प्रवेश तातडीने रद्द करून त्यांना केंद्रीय पद्धतीने अकरावीत प्रवेश देण्यास बजावले आहेत.तरच बारावी परीक्षेचे अर्ज मंजूर!राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची सरलमधील माहिती ३0 सप्टेंबरपर्यंत अपडेट करावी. महाविद्यालयांना मंजूर केलेली प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेऊनच बारावी परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले जातील, असा इशारासुद्धा दिला आहे.लवकरच कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येईल. ज्यांनी मंजूर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिले आहेत. त्यांनी ते रद्द करावेत. अन्यथा त्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. २प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक जि.प. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय