शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची कामे ‘रोहयो’ अंतर्गत समाविष्ट करा!

By admin | Updated: January 14, 2015 23:39 IST

अकोला येथे पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू यांची शासनाकडे मागणी.

अकोला- श्रमावर आधारित योजना राबवून शेतीचा उत्पादन खर्च कमी केला जाऊ शकतो. त्यासाठी शेतीची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात यावी. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनावरील खर्च कमी होऊन कष्ट करणारा शेतकरी नफ्याचा वाटेकरी होईल. त्यामुळे शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. प्रहार संघटनेच्या अकोला जिलतील कार्यकर्त्यांंची आढावा बैठक घेण्यासाठी अकोला येथे आलेले आ. कडू यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजप सरकार काँग्रेस आघाडी सरकारचेच धोरण राबवित असल्याचा आरोप केला. शेतकरीविरोधी निर्णय घेणार्‍या शासनाविरुद्ध रायगडाच्या पाथ्याशी उपोषण करून एल्गार पुकारणार असल्याचे आ. कडू यांनी जाहीर केले. केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शेतकर्‍यांना ह्यअच्छे दिनह्णची प्रतीक्षा होती, मात्र शेतीमालाचे हमी दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत. वस्तूंचे दर कधी कमी होताना आढळत नाहीत. शेतीमालाचे दर कमी होणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर कमी झाले आहेत. कांद्याचे दर वाढत आहे आणि शासनाला ते स्वस्तात द्यावयाचे आहे तर त्यांनी रास्त भाव दुकानातून द्यावे. त्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरणे योग्य नाही. शेतकर्‍यांचा उत्पादनावरील एकूण खर्चापैकी ७५ टक्के खर्च हा मजुरीवर होतो. ही कामे एमआयईजीएसअंतर्गत केल्यास अल्पभूधारक शेतकर्‍यांना त्याचा फायदा मिळेल. गावातच रोजगार निर्मिती झाल्यामुळे शहराकडे रोजगाराच्या शोधात येणार्‍यांची संख्या कमी होईल. तसेच मजुरीवरील खर्च कमी झाल्यामुळे उत्पादनावरील खर्चात कमी होऊन नफ्यात वाढ होईल. त्यातून आर्थिक संपन्नता येऊन शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, असा दावा आमदार कडू यांनी केला. *उद्योगपूर्ण गावांची संकल्पना राबवाजेथे कचरा नाही, तेथे स्वच्छता अभियान राबविले जात आहे. गावांमध्ये शौचालयांचा आग्रह धरला जातो. शहरातील घाण मात्र कुणाला दिसत नाही. अशा योजना राबविण्यापूर्वी गावातील माणसाला आर्थिकदृष्ट्या संपन्न करा. त्यासाठी उद्योगपूर्ण गावांची संकल्पना शासनाने राबविली पाहिजे. जेणेकरून गावातील माणसाला त्याच्याच गावात रोजगार मिळू शकेल, असे आमदार कडू म्हणाले. कष्टकर्‍यांना विद्रूप करू नका!अकोला शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम राबविताना गरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले जात आहेत. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी अतिक्रमण काढले जात असताना कष्टकरी आर्थिकदृष्ट्या ह्यविद्रूपह्ण होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गजर असल्याचे आ. कडू म्हणाले. कष्टकर्‍यांसाठी आंदोलन उभारण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.