शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘हुक्का पार्लर’ प्रकरणाची दोन यंत्रणांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:07 IST

अकोला : पातूर रोडवरील अमनदीप ढाब्यावर अवैधरीत्या  सुरू असलेल्या ‘हुक्का पार्लर’वर जिल्हा पोलीस अधीक्षक  एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई  केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी पोलीस आणि अन्न व  औषध प्रशासन या दोन यंत्रणेकडून करण्यात येणार आहे.  हुक्का पार्लरमधून १0 मुख्याध्यापक, शिक्षक, १0 विद्यार्थी व  ढाबा मालकास अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देशिक्षक पतसंस्थेचा संचालकही आरोपीशिक्षकांना बडतर्फ करा! विशेष पथकाची जिल्हाभर चर्चा

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पातूर रोडवरील अमनदीप ढाब्यावर अवैधरीत्या  सुरू असलेल्या ‘हुक्का पार्लर’वर जिल्हा पोलीस अधीक्षक  एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई  केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी पोलीस आणि अन्न व  औषध प्रशासन या दोन यंत्रणेकडून करण्यात येणार आहे.  हुक्का पार्लरमधून १0 मुख्याध्यापक, शिक्षक, १0 विद्यार्थी व  ढाबा मालकास अटक करण्यात आली होती.पातूर रोडवरील नावाजलेल्या अमनदीप ढाब्यावर मोठय़ा  प्रमाणात अवैधधंदे चालत असून, बेकायदेशीररीत्या ‘हुक्का  पार्लर’ चालविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस  अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे  प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह  शनिवारी मध्यरात्री गंगानगर येथील रहिवासी मोहम्मद मुख् तबीर शेख बशीर याच्या मालकीच्या अमनदीप ढाब्यावर छा पेमारी केली. या छापेमारीत शिक्षक       महेश सीताराम  मानकरी (३९), दिनेश आत्माराम केकन (४0), संतोष  तेजसिंह राठोड (४३), विजय पांडुरंग भुतकर  (३८),  सुनील ज्ञानदेव गवळी (३६), गोपीकृष्ण राजाराम येनकर  (५१), सुखदेव रामजी शिंदे (४0), अनिल नामदेव दाते  (४४),  संजय देवराव इंगळे (४३), धीरज नंदू यादव  (३२), या १0 मुख्याध्यापक, शिक्षकांसह १0 विद्यार्थी व  ढाबा मालकास अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून  १ लाख १0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे. या कारवाईत पातूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या  जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक असून, सिंधी  कॅम्पमधील १0 विद्यार्थी सहभागी आहेत. यामधील विद्या र्थ्यांची चौकशी अन्न व औषध विभाग करणार असून, मु ख्याध्यापक- शिक्षकांची चौकशी पोलिसांकडून करण्यात  येणार आहे.

शिक्षक पतसंस्थेचा संचालकही आरोपीविशेष पथकाने केलेल्या कारवाईत अकोला जिल्हा शिक्षक  सहकारी पतसंस्थेचा संचालक संजय देवराव इंगळे यालाही  हुक्का पार्लरमधून ताब्यात घेण्यात आले.

शिक्षकांना बडतर्फ करा! विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे कार्य करणार्‍या शिक्षक व  मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना सोबत घेऊनच हुक्का पार्टी कर ताना रंगेहात अटक केल्यानंतर, या १0 शिक्षक, मुख्याध्या पकांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी होत आहे. या  शिक्षकांनी शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा प्रताप केला  असून, राज्यभरातील शिक्षकांच्या प्रतिमेला मोठा डाग  लावला आहे. त्यामुळे या शिक्षक व मुख्याध्यापकांवर ता तडीने बडतर्फची कारवाई करण्याची मागणी होत आहे.

विशेष पथकाची जिल्हाभर चर्चाजिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या  विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी जबाबदारी  स्वीकारल्यानंतर सर्वाधीक कारवाया केल्या. त्यामुळे अनेक  पोलीस अधिकार्‍यांची गोची होत असल्याने या पथकाला  बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. या पथकाला  भ्रमणध्वनीवर माहिती देताच तातडीने कारवाई करण्यात येत  असल्याने नागरिकांचाही विश्‍वास संपादन झाला आहे.  पोलीस अधीक्षक कलासागर पथकाच्या पाठीशी ठामपणे  असल्याने विशेष पथकाला एक वेगळी ओळख मिळाली  आहे.