शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सहकार मंत्र्यांच्या आदेशानंतरही नाफेड केंद्रावरील चौकशी थंडबस्त्यात

By admin | Updated: June 7, 2017 19:27 IST

तेल्हारा बाजार समिती केंद्रावरील गैरप्रकार : चौकशीत पाणी मुरले

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नाफेड तूर केंद्रावरील तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला. या गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रकाशित केल्याने या वृत्ताची दखल घेत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी १६ मे रोजी मुद्देनिहाय चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. परंतु या गैरप्रकार प्रकरणाची चौकशी सध्या थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.तेल्हारा येथे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाने नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू केले. परंतु येथे सुरुवातीपासूनच या केंद्रावर अनेक गैरप्रकार झाले आहेत. बोगस टोकन देऊन अनेकांनी आपली तूर मोजून घेतली. एवढेच नव्हे तर एका प्राध्यापकाने मृत वडिलांच्या नावावर तूर मोजण्याचा प्रताप केला. पुरवणी टोकनच्या नावावर मोठ्या प्रमाणात बोगस टोकन दिले गेले. बाजार समितीच्या रेकॉर्डमध्ये अनेक ठिकाणी खोडतोड करण्यात आली. तसेच रेकॉर्डवर ८२ नग असताना १८२ नग करून व पुरवणी टोकन देऊन हजारो क्विंटल तूर मोजण्यात आली. बाजार समितीच्या संचालकांच्या नावाने रेकॉर्डला नोंद आहे. मात्र, कोणाच्या वाहनाने तूर आणली, त्याचा वाहन क्रमांक नाही. एवढेच काय खुद्द बाजार समिती सभापतींच्या मुलीच्या नावाने बाजार समितीच्या रेकॉर्डवर नोंद आहे. मात्र, नगाची कुठलीच नोंद नसणे, ही बाब गंभीर आहे. तुदगाव येथील शेतकऱ्यांच्या नावावर २२४ नगाची नोंद आहे. मात्र, कोणत्या वाहनाने तूर आणली त्याचा उल्लेखच नाही. एका वाहनात एवढी तूर आलीच कशी असा प्रश्न पडतो. १०८२ या टोकनवरून १० शेतकऱ्यांना पुरवणी टोकन देण्याचा प्रताप बाजार समितीने केला. विशेष म्हणजे पुरवणी टोकन केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांनाच देता येते. परंतु ,जानराव पाथ्रीकर या शेतकऱ्याच्या नात्यात नसलेल्या अनेकांना पुरवणी टोकनचे वाटप बाजार समितीने करून तूर मोजली.या सर्व गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्याने सदर तक्रार शेतकऱ्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केल्यानंतर सहकार मंत्री देशमुख यांनी त्वरित दखल घेऊन अकोला जिल्हाधिकारी यांना तेल्हारा नाफेड केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश १६ मे रोजी दिल्यानंतरही चौकशी थांबली कुठे, असा सवाल शेतकरी करीत आहेत.