अकोला - कापशी (तलाव) येथील निरपराध ग्रामस्थांना केलेली अमानुष मारहाण ही अकोला पोलिसांची विकृती दर्शवत असून, या घटनेची दंडाधिकारी किंवा सीआयडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी गुरुवारी केली. सात दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही तर आबालवृद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी नेते व गावकर्यांनी दिला. शिवसेना नेते गुलाबराव गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, गजानन दाळू गुरुजी यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत कापशी गावात पोलिसांनी गावकर्यांवर केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले व १00 वर पोलीस कर्मचारी या घटनेसाठी दोषी असून या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी करून सात दिवसांच्या आत कठोर कारवाई न केल्यास कापशी येथील सर्व ग्रामस्थ पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
कापशी प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा!
By admin | Updated: April 24, 2015 02:10 IST