शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी थंड बस्त्यात!

By admin | Updated: June 8, 2017 01:33 IST

तेल्हारा बाजार समिती केंद्रावरील गैरप्रकार : सहकारमंत्र्यांच्या आदेशानंतरही प्रगती नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नाफेड तूर केंद्रावरील तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला. या गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रकाशित केल्याने या वृत्ताची दखल घेत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी १६ मे रोजी मुद्देनिहाय चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले; परंतु या गैरप्रकार प्रकरणाची चौकशी सध्या थंड बस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.तेल्हारा येथे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाने नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू केले; परंतु येथे सुरुवातीपासूनच या केंद्रावर अनेक गैरप्रकार झाले आहेत. बोगस टोकन देऊन अनेकांनी आपली तूर मोजून घेतली. एवढेच नव्हे तर एका प्राध्यापकाने मृत वडिलांच्या नावावर तूर मोजण्याचा प्रताप केला. पुरवणी टोकनच्या नावावर मोठ्या प्रमाणात बोगस टोकन दिले गेले. बाजार समितीच्या रेकॉर्डमध्ये अनेक ठिकाणी खाडाखोड करण्यात आली, तसेच रेकॉर्डवर ८२ नग असताना १८२ नग करून व पुरवणी टोकन देऊन हजारो क्विंटल तूर मोजण्यात आली. बाजार समितीच्या संचालकांच्या नावाने रेकॉर्डला नोंद आहे; मात्र कोणाच्या वाहनाने तूर आणली, त्याचा वाहन क्रमांक नाही. एवढेच काय खुद्द बाजार समिती सभापतींच्या मुलीच्या नावाने बाजार समितीच्या रेकॉर्डवर नोंद आहे; मात्र नगाची कुठलीच नोंद नसणे, ही बाब गंभीर आहे. तुदगाव येथील शेतकऱ्यांच्या नावावर २२४ नगाची नोंद आहे; मात्र कोणत्या वाहनाने तूर आणली, त्याचा उल्लेखच नाही. एका वाहनात एवढी तूर आलीच कशी, असा प्रश्न पडतो. १०८२ या टोकनवरून १० शेतकऱ्यांना पुरवणी टोकन देण्याचा प्रताप बाजार समितीने केला. विशेष म्हणजे पुरवणी टोकन केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांनाच देता येते; परंतु जानराव पाथ्रीकर या शेतकऱ्याच्या नात्यात नसलेल्या अनेकांना पुरवणी टोकनचे वाटप बाजार समितीने करून तूर मोजली.या सर्व गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्याने सदर तक्रार शेतकऱ्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केल्यानंतर सहकार मंत्री देशमुख यांनी त्वरित दखल घेऊन अकोला जिल्हाधिकारी यांना तेल्हारा नाफेड केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश १६ मे रोजी दिल्यानंतरही चौकशी थांबली कुठे, असा सवाल शेतकरी करीत आहेत. तसाच आदेश जिल्हा निबंधक अकोला व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनाही दिला; मात्र या केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस टोकन दिल्यानंतरही चौकशी का थांबली, चौकशीत पाणी मुरले काय, सहकार मंत्र्यांनी आदेश काढल्यानंतर कार्यवाही न होणे, ही गंभीर बाब आहे. तूर मोजणीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी बाजार समितीचे विरोधी पक्ष नेता श्याम भोपळे यांनी केली आहे. तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी अकोट येथील सहायक निबंधक डी. यू. शेकोकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरुद्धचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.- पी. आर. लाडजिल्हा निबंधक, सहकारी संस्था, अकोला.