शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी घोळाची चौकशी सुरू

By admin | Updated: May 17, 2017 02:20 IST

नाफेडच्या केंद्रावरील प्रकार : तालुका उपनिबंधकांसह लेखा परीक्षकांचे पथक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नाफेडच्या बाजार समितीतील केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची तूर मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, दलालांची चौकशी करण्यासाठी सहकार विभागाच्या तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या नेतृत्वातील पथकाला आदेश देण्यात आले आहेत. भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांच्या तक्रारीनुसार ही चौकशी केली जात आहे. बाजार समितीमध्ये तुरीला पुरेसा भाव नसल्याने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात बाजारात कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या केंद्रात विकण्याचा सपाटाच व्यापारी, दलाल, कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने लावला. संगनमताने हा प्रकार करण्यात आला. या प्रकाराची तक्रार भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली. त्याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्या तुरीचे काय केले, कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीने कोणती कारवाई केली, नाफेडमध्ये तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कोणाला पैसे दिले गेले, याची सखोल तपासणी करण्याचे बजावले. त्यानुसार ही चौकशी तालुका उपनिबंधक फुपाटे यांच्याकडून केली जाणार आहे. फुपाटे यांच्यासह सहकार विभागाचे लेखा परीक्षक वीरेंद्र सपकाळ, तालुका लेखा परीक्षक एस.एन. ढोेले यांचीही पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये मानकर यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघडपणे कमी दराने तुरीची खरेदी करणारे ८८ व्यापारी असल्याचे नमूद केले आहे. त्यांची यादीही तक्रारीसोबत दिली. त्यांच्यावर बाजार समितीने कोणतीच कारवाई केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बाजार समितीमध्ये नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने त्यांच्या बोलावण्यावरून तेथे गेलेले भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी तक्रारीतून केवळ जाब विचारला असताना त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले, याप्रकरणी महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनचे मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांचीही चौकशी होणार आहे.