शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंदुरा येथील ग्रामस्थांचे अभिनव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:15 IST

अंदुरा (अकोला): येथील ग्रामस्थांनी अभिनव आंदोलन करीत गावातील गटारांना मेणबत्ती लावत ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्राम प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी गावातील गटारांना मेणबत्ती लावत ग्राम प्रशासनाचा निषेध करीत १६ सप्टेंबर रोजी करण्यात आला.

ठळक मुद्देगटारात मेणबत्ती लावून केले आंदोलनग्रामपंचायत प्रशासनाचा नाकर्तेपणाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअंदुरा (अकोला): येथील ग्रामस्थांनी अभिनव आंदोलन करीत गावातील गटारांना मेणबत्ती लावत ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्राम प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी गावातील गटारांना मेणबत्ती लावत ग्राम प्रशासनाचा निषेध करीत १६ सप्टेंबर रोजी करण्यात आला.ऐन पावसाळ्याच्या दिवसांत गावातील विद्युत खांबावर पथदिवे नाहीत. रस्त्याालगतच्या नाल्या गाळाने भरल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी, रस्त्याच्या मध्यभागी गटारगंगा झाली आहे. त्या घाण पाण्यामधून विद्यार्थी व ग्रामस्थांना नाइलाजाने यावे-जावे लागत आहे. या ठिकाणी बरेचदा वृद्ध, विद्यार्थी पाय घसरून, दुचाकीस्वार वाहन घसरून पडले आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनसुद्धा त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या शारीरिक आरोग्याचे नुकसान होत आहे. दलित वस्तीमध्ये गटाराच्या समस्येने रौद्र रूप धारण केले आहे. गावामध्ये एकीकडे साथीच्या रोगाचे थैमान पसरले असून, त्यामध्ये ताप, हिवताप, मलेरिया यासारख्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी शेगाव, अकोला या ठिकाणी जाऊन उपचार करीत आहेत. तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे ग्रामस्थांनी शनिवारी गटारांमध्ये मेणबत्ती लावण्याचे अभिनव आंदोलन करून ग्रामपंचायत प्रशासनाला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आतातरी गावातील गटार, पथदिवे व अन्य समस्या दूर होतील, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.