शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर अत्याचार करणारा कारागृहात

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 02:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्योती नगर येथील रहिवासी तसेच केबल आॅपरेटर शैलेश माथने याने चार वर्षाआधी घरात भाडेकरू असलेल्या ९ वर्षीय चिमुकलीसोबत अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्योती नगर येथील रहिवासी तसेच केबल आॅपरेटर शैलेश माथने याने चार वर्षाआधी घरात भाडेकरू असलेल्या ९ वर्षीय चिमुकलीसोबत अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.शेखर रामदास माथने (४८) हा जठारपेठ परिसरातील ज्योती नगर येथे रहिवासी आहे. चार वर्षांपूर्वी पीडित मुलगी नऊ वर्षांची असताना माथनेच्या घरात आई-वडिलांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. ही अल्पवयीन मुलगी शेखर माथनेच्या घरात टीव्ही पाहण्यासाठी जात होती. त्यावेळी माथने हा मुलीला मांडीवर बसवून तिच्या शरीराला नको तिथे हात लावत होता. एक दिवस ती टीव्ही पाहण्यासाठी घरात आली असता तिला मांडीवर बसवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला; परंतु त्यावेळी मुलीला समज नसल्याने प्रकरण शांततेत होते. दरम्यान, ही मुलगी सध्या शहरातील एका शाळेत इयत्ता आठवी वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. या शाळेमध्ये सोमवारी दामिनी पथकाच्या मार्गदर्शनादरम्यान, त्या मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आठवण आली. तिच्या सांगण्यावरून दामिनी पथकाने केबल आॅपरेटर शैलेश माथनेविरोधात सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.