अकोला: टिळक रोड व जुना कापड बाजारातील दुकाने फोडून लाखो रुपयांचा माल लंपास करणार्या कुख्यात घरफोड्यास कोतवाली पोलिसांनी गुरुवारी नांदेड कारागृहात अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २२ डिसेंबरपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. १९ मार्च रोजी जुना कापड बाजारातील एक दुकान फोडून ५0 हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला. त्यानंतर ताजनापेठ परिसरातील दुकान फोडून ६0 हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून नांदेड जिल्हय़ातील शेख अफरोज आणि अक्रम यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सैयद रहिम याचे नाव समोर आले. पोलीस त्याचा शोध घेत असताना, तो नांदेड कारागृहात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. कोतवाली पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला नांदेड कारागृहातून गुरुवारी अटक केली. ही कारवाई ठाणेदार अनिरुद्ध आढाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक श्यामकुमार शर्मा, राजेंद्र तेलगोटे, विपुल सोळंके, नीलेश इंगळे, नीलेश पाचपवार, शेख माजिद यांनी केली.
कुख्यात घरफोड्यास अटक; मंगळवारपर्यंंत पोलीस कोठडी
By admin | Updated: December 18, 2015 02:13 IST