शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

‘प्लास्टिक मुक्ती’साठी सरसावले शासन; गावागावांतून करणार कचऱ्याची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 15:46 IST

खुल्या जागा, नाल्या, रस्त्यांवर पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिकमुक्त केला जाणार आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: जमिनीवर कुठेही पडून असलेला प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचा रस्ता कामात वापर किंवा नष्ट करण्यासाठी शासनस्तरावर जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी (महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत) प्लास्टिक गोळा करावे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याची विल्हेवाट लावली जाईल, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्तांना शुक्रवारी दिले.प्लास्टिक कचºयामुळे व मायक्रो प्लास्टिकमुळे सागरी जीव, नदी-नाल्यातील जलचर व जैवविविधतेवर परिणाम होतो. शेती, वने या ठिकाणी प्लास्टिकमुळे उपयुक्त नैसर्गिक घटक व साधन संपत्तीचा ºहास होतो. त्याशिवाय, मानवी आरोग्यावरही भयंकर परिणाम होतो. त्यासाठी प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी शासनाने २३ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत प्लास्टिक बंदीसाठी कारवाईची जबाबदारी महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळावर सोपवली. प्लास्टिक निर्मिती रोखण्याच्या मुद्यावर कारवाई करणेही गरजेचे आहे. त्याच वेळी सर्वत्र जमा झालेल्या प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी प्लास्टिक कचरा गोळा करण्याची मोहीम श्रमदानातून राबवण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने ती सुरू करावी, असेही बजावण्यात आले.

- कचºयाची उचल प्रदूषण मंडळ करणारप्रत्येक शहर, ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या जागा, नाल्या, रस्त्यांवर पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिकमुक्त केला जाणार आहे. गोळा केलेला प्लास्टिक कचरा उचलण्याची तसेच विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मंडळाकडे असलेल्या नियोजनानुसार कचºयाचा वापर किंवा नष्ट केला जाणार आहे.

- प्रत्येक जिल्हा परिषद गटातून ४ टन कचराअकोला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटातून १ ट्रक (४ टन) प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी शनिवारी सर्व जिल्हा परिषद, माध्यमिक, खासगी शाळांच्या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. उद्या रविवारी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, संस्था, ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPlastic banप्लॅस्टिक बंदी