शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील जनावरांची घुसखोरी!

By admin | Updated: October 15, 2016 02:58 IST

परराज्यातील गुरांमुळे बुलडाणा जिल्ह्यात जनावरांसाठी चराईचे संकट उभे ठाकले आहे.

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. १४- यंदा परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनावरांचे चराई क्षेत्र मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाले आहे. शिवाय अलीकडेच वनपरिक्षेत्रातील बराच भाग आरक्षित झाल्यामुळे या क्षेत्रात जनावरे चराईस मनाई करण्यात आली आहे. अश्यात जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रातून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थानमधील शेळ्या, मेंढय़ा व गाई, बैलसारख्या जनावरांची घुसखोरी होत आहे. परप्रांतातून येणार्‍या गायी शेळ्या, मेंढय़ा व अन्य जनावरांमुळे जिल्ह्यातील जनावरांच्या चराईचे संकट उभे राहत आहे. परप्रांतीय जनावरांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून, चराईचे क्षेत्र कमी झाले. त्यामुळे या जनावरांना जिल्ह्यात बंदी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन विभागाकडे शेतकर्‍यांनी केली आहे.खरीप हंगामानंतर शेती मोकळी होऊन चराईच्या क्षेत्रात वाढ होऊन जनावरांना चारा उपलब्ध होते; मात्र आता शेतकर्‍यांच्या शेतात पिके असल्याने चराईचा प्रश्न उभा आहे. वनक्षेत्र व डोंगरपायथ्याशी पशुपालक पावसाळ्यात आपली जनावरे चराईसाठी आणून वास्तव्य करत आहे. परप्रांतीय जनावरांवर बंदी घाला!परप्रांतीय जनावरांची जिल्ह्यात संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यातील जनावरांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या जनावरांच्या चराईवर बंदी घाला, अशी मागणी जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यातील सुनगाव व पिंगळी येथील गजानन कुकडे, भीमराव घुले, बाळु नेमाने, भीमराव डोमाळे, सुभाष डोमाळे, शिवा घुले, बन्सी घुले, वामन घुले, लक्ष्मण मोरे, बाबू मोरे, गंगाराम डोमाळे, डिगांबर डोमाळे, सोना मदणे, संजय मारनर, महादेव पोकळे यांच्यासह १00 पशुपालक शेतकर्‍यांनी निवेदनातून केली आहे.जनावरांच्या तुलनेत चराई क्षेत्र कमीजिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ३८ हजार ९९७ आहे. तर २६ हजार २२८ हेक्टर क्षेत्र जनावरांच्या चराईसाठी उपयुक्त आहे; मात्र या क्षेत्रातील चारा जिल्ह्यातील जनावरांना वर्षभर पुरत नाही. त्यातच इतर राज्यातील जनावरांची घुसखोरी होत आहे. यामुळे आपल्या जनावरांना वर्षभर चारा कसा उपलब्ध करुन द्यावा, असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा आहे.