शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जुने शहरातील कुख्यात आरोपी एक वर्षासाठी स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

अकोला : जुने शहरातील रहिवासी, तसेच कुख्यात गुंड शाकीर खान ऊर्फ पपया अहमद खान यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जी. ...

अकोला : जुने शहरातील रहिवासी, तसेच कुख्यात गुंड शाकीर खान ऊर्फ पपया अहमद खान यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानंतर सोमवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू केली आहे.

जुने शहरातील हमजा प्लॉट परिसरातील रहिवासी शाकीर खान ऊर्फ पपया अहमद खान हा कुख्यात गुंड असून, पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून, यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, विनयभंग करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई शहर पोलीस उपधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी केली.

जुने शहर पोलीस स्टेशन नंबर वन

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी प्रचंड वाढली असतानाच या पोलीस ठाण्याचा पदभार महेंद्र देशमुख यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या कालावधीत तब्बल आठ गुंडांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जिल्ह्यात जुने शहर पोलीस स्टेशन क्रमांक १ वर असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २८ गुंडांवर एमपीडीए कारवाई करण्यात आल्या असून, यापैकी जुने शहर पोलीस ठाण्यात ८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी गुन्हेगारांचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला आहे.