शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

अमेरिकेतील कनेक्टिकट येथे भारतीय कुटुंबियांनी साजरा केला गणेशोत्सव

By atul.jaiswal | Updated: September 11, 2019 20:01 IST

कनेक्टिकट मधील सर्व भारतीय कुटुंबांना एकत्र आणून संपूर्ण १० दिवस साग्रसंगीत श्री गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

अकोला : ‘देसीज अराउंड रॉकी हिल’ या कनेक्टिकट अमेरिका येथील भारतीयांच्या समुहांतर्गत सलग दुस?्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सन २०१८ पासून, न्यूइंगटन येथील वल्लभधाम मंदिराचे विश्वस्त राजीव देसाई यांच्या सहकायार्ने आणि उपेंद्र व सीमा वाटवे ह्या दाम्पत्याच्या पुढाकाराने, दुर्गेश जोशी, अभिजित दानवे, अभिजित वग्गा, प्रफुल्ल कुलकर्णी, आशय साठे अशा काही हौशी मंडळींनी कनेक्टिकट मधील सर्व भारतीय कुटुंबांना एकत्र आणून संपूर्ण १० दिवस साग्रसंगीत श्री गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची नाळ ही नेहमीच त्याच्या मातीशी जोडलेली असते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला तोच हेतू समोर ठेऊन गणेशोत्सव केवळ मराठी कुटुंबांपुरता मर्यादित न राहता सर्व भारतीयांना त्यात सामावून घेण्याचा ह्या मंडळाचा प्रयत्न आहे.

ढोल, ताशे, लेझीम अशा पारंपरिक स्वरूपात गणरायाचे स्वागत करण्यात आले. लहान मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव व ओढ राहावी यासाठी राबवलेला हा एक अतिशय सुंदर उपक्रम आहे.परदेशातील ब?्याच मंडळात फक्त एकच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो, परंतु या मंडळाची एक विशेष बाब म्हणजे, फक्त एक दिवस एकत्र न येत, संपूर्ण १० दिवस गणेश पूजन, आरती, आराधना केली जाते.

संपूर्ण १० दिवस रोज संध्याकाळी किमान २०० भारतीय एकत्र आरतीला जमतात. प्रत्येक दिवशीच्या आरतीसाठी किमान आठ ते दहा यजमान कुटुंबे असतात आणि त्यांच्याकडेच त्या दिवशीचा सर्वांसाठीचा प्रसाद असतो. मंडळाचे हे दुसरे वर्ष असून, दिवसेंदिवस भारतीयांचा प्रतिसाद वाढतच आहे.

दररोज संध्याकाळी आरती च्या आधी लहान मुलांसाठी समूह गायन, गणपती विशेष प्रश्नोत्तरे, प्रहसने, श्लोकपठण असे विविध उपक्रम आयोजित केले जातात. गणपती अथर्वशीषार्चे सहस्रावर्तन सलग दुस?्या वषीर्ही करण्यात आले. मंडळाच्या कलाकारांनी केलेली सुरेख मखर सजावट ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली. दुर्गेश जोशी यांची लहान मुलांसाठीची खगोलशास्त्र कार्यशाळा, गणपती कला प्रदर्शन यांसारखे दजेर्दार उपक्रम तसेच अनुप्रिया कायंदे ह्यांनी बसवलेली समूह गायनातील पारंपरिक गाणी, क्षमा लाभे व अमृता वडजे ह्यांनी तयार केलेली समाज प्रबोधनपर प्रहसने इत्यादी उल्लेखनीय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. परदेशात राहून आपली संस्कृती जपणा?्या आणि विशेष म्हणजे परदेशातील अनेक भारतीयांना एकत्र आणणारा हा उपक्रम प्रशंसनीय आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAmericaअमेरिकाGanesh Mahotsavगणेशोत्सव