शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष नव्हे, पंथनिरपेक्ष!

By admin | Updated: May 22, 2017 01:12 IST

चुकीची माहिती: पाचवी, सहावीच्या हिंदीच्या पुस्तकामधून विद्यार्थ्यांना शिकविल्या जातेय पंथनिरपेक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भारत हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून जगात ओळखला जातो. भारतीय संविधानामध्येसुद्धा धर्मनिरपेक्षतेला स्थान देण्यात आले आहे. हे राष्ट्र कोण्या एका धर्माचे नसून, या राष्ट्रात अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात; परंतु शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये पहिल्या पानावर छापलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत भारत हे धर्मनिरपेक्ष नसून, पंथनिरपेक्ष असल्याची चुकीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्येसुद्धा भारत धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. गत दोन वर्षांपासून इयत्ता पाचवी व सहावीच्या हिंदी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एका पानावर भारताचे संविधान छापण्यात येत आहे. यात भारत पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य असल्याचे म्हटले आहे; परंतु मराठी विषयाच्या विषयामध्ये भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असल्याचे म्हटले आहे. बालभारतीच्या हिंदी व मराठी विषयाच्या पुस्तकांमधूनच विरोधाभास निर्माण केला जात असून, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भारतीय संविधानामध्ये भारताला धर्मनिरपेक्ष देश म्हटलेले असताना, हिंदी विषयाच्या पुस्तकांमध्ये पंथनिरपेक्ष देश संबोधल्या जात आहे. धर्म आणि पंथ या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. धर्माच्या आधारावर देशामध्ये अनेक पंथ बनतात; परंतु बालभारतीने मराठीतील धर्मनिरपेक्षता आणि हिंदीतील पंथनिरपेक्षता याचा अर्थ एकच काढल्याचा दिसून येत आहेत. यंदाच्या नवीन पाठ्यपुस्तकामध्ये हिंदी विषयात भारतीय संविधान हे पंथनिरपेक्ष असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी आक्षेप घेतला असून, भारत हे धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष राष्ट्र आहे, याविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. गत दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना हिंदीच्या पुस्तकातून पंथनिरपेक्षता शिकविल्या जात आहे. हिंदी व मराठीच्या पुस्तकांमध्ये भारत हे धर्मनिरपेक्षच असायला हवे. असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बालभारतीकडून उत्तर नाहीपाठ्यपुस्तकांमध्ये दोन वर्षांपासून भारत पंथनिरपेक्ष देश असल्याचे छापून येत आहे. याबाबत बालभारती कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बालभारतीच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. तो पंथनिरपेक्ष नाही. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामधील भारताच्या संविधानामध्ये पंथनिरपेक्ष छापलेले आहे ते चुकीचे असून, त्यात बालभारतीने दुरुस्ती करावी. धर्म आणि पंथ हे दोन वेगवेगळे विषय आहेत. त्याचा अर्थ वेगवेगळा आहे. -प्रा. नारायणदास चोटिया,हिंदी साहित्यिक