अकोला : जिल्हय़ात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पाच विधानसभा मतदारसंघात ४४ अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले; पंरतु एकाही अपक्षाला आपले ह्यडिपॉझिटह्ण वाचवता आले नसले, तरी पक्षीय उमेदवारांचे गणित मात्र बिघडवले आहे. याचा सर्वाधिक फटका बाळापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार तेजराव थोरात आणि अकोला पूर्वमधील भारिप-बमसंचे उमेदवार हरिदास भदे यांना बसला आहे. जिल्हय़ातील अकोला पूर्व मतदारसंघात सर्वाधिक १५ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यात भारिप-बहुजन महासंघातून बंडखोरी केलेल्या पुष्पाताई इंगळे आणि प्रवीण जगताप यांनी घेतलेल्या मतांचा फटाका भारिप-बमसंचे उमेदवार हरिदास भदे यांना बसला आहे. पुष्पाताई इंगळे यांनी १५0९ तर प्रवीण जगताप यांनी १0४१ मते घेतली. या मताची बेरजी २५५0 एवढी आहे. भदेंचा पराभव मात्र २४४0 मतांनी झाला आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात सात अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात भाजपा व काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. या मतदारसंघात काँग्रेसचे नारायण गव्हाणकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढली, तर भाजपाच्या विरोधात शिवसंग्रामचे संदीप पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. नारायण गव्हाणकर यांनी या मतदारसंघात १६,२३0 मते प्राप्त करू न काँग्रेसचे नातिकोद्दीन खतीब यांना शह दिला आहे. मूर्तिजापूर या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवारांनी बंडखोरी केली.
अपक्षांनी बिघडवले पक्षीय उमेदवारांचे गणित!
By admin | Updated: October 20, 2014 01:58 IST