शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

राज्यात महिला अत्याचारात वाढ

By admin | Updated: December 3, 2014 23:37 IST

प्रमुख ९ महानगरांची स्थिती विदारक.

अजय डांगे/अकोलापुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे गत वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. सन २0१२च्या तुलनेत २0१३ मध्ये छेडखानीच्या गुन्ह्यात ११0 टक्के, बलात्कार- ६६ टक्के, महिला व तरुणींचे अपहरण-८५.९६ टक्के आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात ८१.१७ टक्के वाढ झाली आहे. दिल्ली येथे घडलेल्या ह्यनिर्भयाह्ण प्रकरणानंतर महिलांवर अत्याचार करणार्‍यांना जन्माची अद्दल घडावी, यासाठी सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केल्या; मात्र तरीही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झाले नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमुख महानगरांत २0१३मध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात सन २0१२च्या तुलनेने २0१३ मध्ये वाढ झाल्याचे आकडेवर नजर टाकल्यास दिसून येते. बलात्काराचे गुन्हे २0१२मध्ये ६0५ तर २0१३मध्ये १ हजार ९ घडले. २0१२ मध्ये महिला व तरुणींच्या अपहरणाचे गुन्हे ४१३ तर २0१३ मध्ये ७६८ गुन्हे घडले. २0१२मध्ये छेडखानीचे १ हजार २८४ तर सन २0१३मध्ये २ हजार ६९९ गुन्ह्यांची नोंद झाली. २0१२मध्ये लौंगिक शोषणाचे ४९४ तर २0१३मध्ये ८९५ गुन्हे दाखल करण्यात आले. पती व नातेवाईकांकडून विवाहितेच्या छळाचेही प्रमाण वाढले असून, २0१२मध्ये १ हजार ८४ तर २0१३मध्ये २ हजार १५९ गुन्हे दाखल करण्यात आले. २0१२ मध्ये हुंडाबळीचे गुन्हे ४२ तर २0१३मध्ये ७१ घडले होते. महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी सामाजिक, पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. अत्याचार थांबण्यासाठी प्रत्येक समाजघटकाने प्रबोधन करणे आणि जबाबदारीने वागणेही गरजेचे असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी लोकमतशी बोलताना नोंदविले.*सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ४औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमख महानगरांमध्ये २0१२च्या तुलनेत २0१३मध्ये सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २0१२ मध्ये या महानगरांमध्ये ७९ हजार १४८, तर २0१३मध्ये ८८ हजार ८२२ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. दोन वर्षात गुन्ह्यांमध्ये १२. २२ टक्के वाढ झाली. खुनाचा प्रयत्न- ८.३१ टक्के, दरोडा-११.५६, लुटमार-५0.७0, चोरी-१.४५, दंगल-५.५४ आणि फसवणुकीचे गुन्ह्यांमध्ये १४.४१ टक्के वाढ झाली. खुनाच्या गुन्ह्यामध्ये मात्र ७.१४ टक्क्यांनी घट झाली.