शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य आजारांमध्ये वाढ, रूग्णालये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 20:07 IST

बुलडाणा : वातावरणातील बदलामुळे जलजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रूग्णालये हाऊसफुल्ल झाली असून, लहान मुले व वृद्ध त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवातावरणात बदल झाल्याने रूग्णांची संख्या वाढलीसर्दी, ताप, खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण रूग्णालये हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वातावरणातील बदलामुळे जलजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रूग्णालये हाऊसफुल्ल झाली असून, लहान मुले व वृद्ध त्रस्त झाले आहेत. यात सर्दी, तापेच्या रुग्णांबरोबरच खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत.  सध्या खोकल्याने कहर केल्याने शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयातही खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.आरोग्य सेवा पुरविण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात शासनातर्फे एक जिल्हा सामान्य रुग्णालय, १५ ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसात विविध जलजन्य आजार डोकेवर काढतात. सध्या वातावरणात अचानक बदल झाल्याने व गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात रूग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याने सामान्य रूग्णालय तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयेसुद्धा हाऊसफुल्ल झाले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, १५ ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामधील ओपीडीचा आकडा वाढला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे सर्दी, ताप, खोकला व फंगल इन्फेक्शनचे आहेत. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दिवसाकाठी १५० ओपीडी होत आहे. तर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात १२५ ते १५० पर्यंत ओपीडी जात आहे, अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयाची सुद्धा आहे. तसेच एका प्राथमिक आरोग्य केंद्राची दिवसाची ओपीडी सुद्धा १०० च्यावर जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व कुठे रिमझीम पाऊस हजेरी लावत असल्याने जलजन्य आजाराला उभारी मिळत आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यात मच्छरांचे प्रमाण वाढून तापेच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.  वाढत्या रूग्णांच्या संख्येत काही रूग्णालयात खाटांची कमतरता असल्याचेही दिसून येते. एका रुग्णालयात दिवसाकाळी शेकडो रूग्ण उपचारासाठी येत आहेत. ग्रामीण रुग्णालयाबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.

खाजगी डॉक्टरांची चांदीग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र हाऊसफुल्ल झाल्यामुळे याचा फायदा खाजगी डॉक्टरांना होत आहे. खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याने खाजगी डॉक्टरांची चांदी आहे.

फिरस्तीच्या डॉक्टरांनी गाठली शंभरीसध्या गावोगावी खाजगी डॉक्टर फिरुन रुग्णांवर उपचार करत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये असे डॉक्टर दररोज पोहचतात. सध्या वातावरणातील बदलामुळे रुग्णांमध्ये वाढ झाली असून, परिणामी फिरस्तीच्या या डॉक्टरांची दिवसाठी १०० ते १२५ रुग्ण तपासणी होत आहे. फिरस्तीचे हे डॉक्टरांकडे सर्दी, ताप, खोकला आदी प्रकारचे रुग्ण सर्वाधिक असल्याची माहिती आहे.

वातावरणातील बदलामध्ये आजाराचे प्रमाण वाढू नये, यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच तालुकास्तरावर सुद्धा नियंत्रण कक्ष  उभारण्यात आला असून, साथरोग  पेटी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे.- डॉ.एस.पी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.--