शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ात वाढ

By admin | Updated: August 6, 2015 01:18 IST

काटेपूर्णा धरण १९ टक्के भरले; अकोलेकरांचे जलसंकट टळले.

अकोला: गेल्या २४ तासांत अतवृष्टी झाल्याने, बुधवारी जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ांमध्ये वाढ झाली. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत १९ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने, दोन महिन्यात ओढवणारे शहरवासीयांचे जलसंकट टळले आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात सोमवार, ३ ऑगस्टपर्यंत केवळ ६ टक्केच जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे शहरवासीयांसमोर जलसंकट उभे असतानाच, गेल्या २४ तासांत बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात अतवृष्टी झाली. अतवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ातही वाढ झाली. बुधवारी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंंत महान येथील काटेपर्णा धरणात १८.५७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. धरणातील जलसाठय़ात वाढ झाल्याने, दोन महिन्यात अकोलेकरांवर ओढवणारे जलसंकट तूर्त टळले आहे. तसेच मोर्णा धरणात २९.0८ टक्के, निगुर्णा धरणात २८.0७ टक्के, उमा धरणात २६.७५ टक्के, तर वान धरणात ६२.२५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला.