शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिका-यांचे सेवानवृत्तीचे वय वाढविले

By admin | Updated: June 2, 2015 01:29 IST

अधिका-यांची वानवा; राज्यातील ४१ अधिका-यांना फायदा.

राजेश शेगोकार /बुलडाणा: राज्य सरकारकडून चालविल्या जाणार्‍या अनेक जिल्हा व तालुका स्तरावरील रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होतो. त्यापृष्ठभूमिवर नवृत्त होणार्‍या अधिकार्‍यांचे सेवानवृत्ती वय वाढवून अधिकार्‍यांची कमी भरून काढण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. त्यानुसार ३१ मे रोजी नवृत्त होणार्‍या ४१ अधिकार्‍यांचे सेवानवृत्त वय वाढवून त्यांना पुन्हा सेवेत समावून घेण्याचा आदेश ३0 मे रोजी काढण्यात आला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत सामान्य रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये चालविली जातात. यामधून गरजू रूग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा पुरविली जाते; मात्र या रूग्णालयातच अधिकार्‍यांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होताना दिसत आहे. ही बाब विचारात घेऊन आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत ३१ मे २0१५ रोजी वयाचे ५८ वर्ष पूर्ण केल्यामुळे नवृत्त होणार्‍या ज्या अधिकार्‍यांची वेतनङ्म्रेणी १५६00-३९१00 ग्रेड वेतन ५४00 व त्यावरील आहे अशा अधिकार्‍यांचे नवृत्ती वयोमान दोन वर्षांनी वाढविण्यात आले आहे. यासंदर्भात राज्याचे अवर सचिव वि.पु.घोडके यांच्या सहीने ३0 मे रोजी अध्यादेश काढण्यात आला असून हा निर्णय केवळ वैद्यकीय सेवेसाठीच लागू केला असल्याचे नमुद केले आहे.