शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील धरणांच्या जलसाठय़ात वाढ

By admin | Updated: August 10, 2015 00:47 IST

काटेपूर्णा २५ टक्के, नळगंगा २३ टक्के, पूस धरण ३६ टक्के भरले.

अकोला: गत आठवडाभरात दमदार पाऊस बरसल्याने, अमरावती विभागातील धरणांच्या जलसाठय़ात वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंंत अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरण २४.९१ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा २३.७३ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात ३६.९0 टक्के जलसाठा उपलब्ध झाला. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, पश्‍चिम विदर्भातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. तसेच यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर दीड महिना पावसाने दांडी मारली. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असतानाच, गत मंगळवार व बुधवारी विभागातील पाचही जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. दमदार पाऊस बरसल्याने, धरणांमधील जलसाठय़ात वाढ झाली. त्यामध्ये रविवारी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंंत अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात २४.९१ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २३.७३ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात ३६.९0 टक्के जलसाठा उपलब्ध झाला. धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यास धरणाच्या जलसाठय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

रविवारी सायंकाळपर्यंंत धरणांमधील उपलब्ध जलसाठा !

जिल्हा            प्रकल्प                   टक्केवारी

अकोला               काटेपूर्णा              २४.९१

                          मोर्णा                 ३३.८७

                          निगरुणा               ४१.२३

                                उमा                २८.२६

                                 वान             ८१.७२

बुलडाणा                 नळगंगा             २३.७३

                              ज्ञानगंगा           ४१.५३

                                     मस           ३९.0२

                                   कोराडी          0४.४९

                                    पलढग         ५१.६६

यवतमाळ                           पूस         ३६.९0

                                  लोअरपूस        ५६.७0

                                     सायखेडा        ९३.१५

                                          गोटी        ६९.८0

                                         वाघाळी      ७८.९७

                                         बोरगाव       ७४.२८

*जलग्रहण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा!

मंगळवार व बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पश्‍चिम विदर्भात धरणांमधील जलसाठय़ात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी, पुरेसा जलसाठा उपलब्ध होण्यासाठी धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा आहे.