शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानात महिलांची टक्केवारी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 01:27 IST

२४ हजारांवर महिलांचे रक्तदान; युवकांचे प्रमाणही समाधानकारक.

नितीन गव्हाळे /अकोलाप्रत्येक क्षेत्रातच महिला पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. रक्तदानासारख्या पुण्यकार्यातही त्या मागे नाहीत. गत पाच वर्षांच्या रक्तदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, अकोल्यात २४ हजार ६८0 महिलांनी रक्तदान करून पुरुषांच्या तुलनेत आम्हीही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. रक्तदानामध्ये युवकांचेही प्रमाण समाधानकारक असून, दरवर्षी युवकांच्या रक्तदानातही वाढ झाल्याचा शुभसंकेत आकडेवारीवरून दिसून येतो. महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता, बदलती जीवनशैली, कमी आणि असंतुलित आहार यामुळे महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे इच्छा असून महिला रक्तदान करू शकत नाहीत; परंतु गत पाच वर्षांमध्ये महिलांच्या रक्तदान करण्याच्या प्रमाणात बर्‍याच अंशी चांगली वाढ झाली आहे.गत पाच वर्षांमध्ये शहरातील रक्तपेढय़ांमध्ये एकूण १ लाख ५ हजार ३९ जणांनी रक्तदान केले. यात महिलांचे मोठे योगदान दिले. गत काही वर्षांमध्ये महिलांच्या रक्तदानात नेत्रदीपक वाढ झाली आहे. २0१४ व २0१५ या दोन वर्षांत महिलांचा रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला रक्तदात्यांची संख्या कमी असली तरी, त्यांची शारीरिक क्षमता व हिमोग्लोबिनची कमतरता लक्षात घेता, एवढय़ा महिलांना रक्तदानासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.