शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग प्रमाणपत्र वितरणात जाचक अटींचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:44 IST

अकोला : दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असलेल्या जाचक अटींमुळे हे प्रमाणपत्रे देण्याचे काम मात्र अत्यंत धिम्या गतीने होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअमरावती विभाग : २२७८ अर्जांपैकी १३०१ जणांना प्रमाणपत्रे जारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असलेल्या जाचक अटींमुळे हे प्रमाणपत्रे देण्याचे काम मात्र अत्यंत धिम्या गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. १ मे २०१७ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी अर्ज केलेल्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील २२७८ व्यक्तींपैकी केवळ १३०१ दिव्यांगांनाच हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून त्यांना विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या सोयी-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे मात्र कठीण होऊन बसले आहे. विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना शासनाकडून दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी केल्या जाते. यासाठी संबंधित व्यक्तीला जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रीतसर अर्ज करावा लागतो. शारीरिक दिव्यांगत्व, दृष्टिदोष, कर्णबधिर, मानसिकदृष्ट्या असामान्य असलेल्यांना विविध तपासण्यानंतर हे प्रमाणपत्र जारी केले जाते. यासाठी दिव्यांगत्वाची टक्केवारी किमान ४० असावी लागते. यासाठी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दररोज अनेकजण जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अर्ज दाखल करतात. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाकडून विविध वर्गवारीनुसार दिव्यांग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील २२७८ दिव्यांग बांधवांनी १ मे २०१७ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी १३०१ जणांना हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, तर ३०२ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले असून, ६७५ जणांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. जाचक अटींमुळे प्रमाणपत्र वितरणाची गती मंदावल्याचे चित्र आहे.