शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दुध उत्पादनाला बळकटी देण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 17:59 IST

सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुक्रमे ५० रुपये प्रति किलो व ५ रुपये प्रति लिटर प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश आहे.

अकोला: राज्यातील पशुपालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व त्याचा दुध उत्पादनावर होणारा परिणाम तसेच सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना उपलब्ध अपुºया सुविधा आदी बाबी लक्षात घेता दूध भुकटी प्रकल्प व द्रवरूप दूध उत्पादनासाठी शासनाने प्रोत्साहनपर अनुदानाच्या माध्यमातून बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्वतंत्र व नवीन योजना असल्याचे लक्षात घेऊन याकरीता स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यात आले आहे.राज्यात सर्वाधिक दूध उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात घेतल्या जाते. परंतु दूधाची एकूणच उपलब्धता आणि वाढती मागणी पाहता राज्यातील दूध उत्पादक प्रकल्पांसह पशुपालकांना शासनाच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. ग्राहकांना अपेक्षनुसार दूधाचा पुरवठा होत नसल्यामुळेच गुजरातमधून मोठ्या प्रमाणात दूधाची आयात केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पिशवीबंद दूधाचा समावेश आहे. अशास्थितीत राज्यातील सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना बळकटी देण्याचा निर्णय घेत शासनाने प्रोत्साहनपर अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यामध्ये सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुक्रमे ५० रुपये प्रति किलो व ५ रुपये प्रति लिटर प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश आहे. तसेच राज्यात उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दूध रुपांतरणासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदानाचा समावेश आहे.परराज्यातून दूधाचा पुरवठामुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसह राज्यातील सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये दूधाचा पुरवठा करण्यासाठी राज्यातील दूध उत्पादक संघ, खासगी दूध प्रकल्प आणि पशुपालकांना शासनाने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ती पूर्ण होत नसल्यामुळे गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातून पिशवीबंद दूधाची मोठ्या प्रमाणात आयात केली जात आहे. परराज्यातील दूधाचे दर कमी असल्यामुळे स्थानिक दूध उत्पादकांची कोंडी होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMilk Supplyदूध पुरवठा